भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१८ मतदान केंद्रांपैकी १५३ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यांचे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे. यामध्ये शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील ५८ मतदान केंद्रांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
निवडणूक काळात भिवंडीत विविध ठिकाणी हाणामारी, दमदाटी तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता, काही मतदान केंद्रे व इमारती पोलिस दप्तरी कायमस्वरूपी संवेदनशील म्हणून नोंदविलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान या केंद्रांवर पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत सतत नजर ठेवण्यात येणार आहे. शहरातील एकूण १७३ इमारतींमध्ये ७१८ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापैकी १४६ इमारतींमधील ५६५ केंद्रे सर्वसाधारण स्वरूपाची आहेत. तर उर्वरित २७ इमारतींमधील १५३ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त बंदोबस्त, गस्ती पथके आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
संवेदनशील भाग
आयटीआय इमारत (ईदगाह), हंडी कम्पाउंड, आजमी नगर, टावरे कम्पाउंड, समदनगर, नवी बस्ती, प्रभाग क्रमांक ३ येथील इमारत, शास्त्रीनगर, भाग्यनगर, संगम पाडा, कोंबडपाडा, म्हाडा कॉलनी, बंदर मोहल्ला; तसेच भंडारी कम्पाउंड या भागांमध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

