सांस्कृतिक उपक्रमांमुळे सुप्त कला गुणांचा विकास : नगराध्यक्ष

सांस्कृतिक उपक्रमांमुळे सुप्त कला गुणांचा विकास : नगराध्यक्ष

Published on

सांस्कृतिक उपक्रमांमुळे सुप्त कलागुणांचा विकास : नगराध्यक्ष
रोहा, ता. १० (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेणे आवश्यक असून, त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे प्रतिपादन रोहा अष्टमी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अष्टमी येथील मेहबूब इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, महेंद्र गुजर, अहमद दर्जी, राजेंद्र जैन, महेश कोलटकर, सीमा दामाद, फरहान दामाद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात तेहमीना बंदरकर यांनी शैक्षणिक आढावा मांडला. सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंपळे यांनी ऑडिओ-व्हिज्युअल रूमसाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली. बेस्ट गर्ल खदिजा मुदस्सीर बेबन व बेस्ट बॉय जकवान जावेद नाडकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चौकट
पहलगाम हल्ला बदल्याची झलक
काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध भारतीयांचा बदला भारतीय जवानांनी घेतल्याचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून सादर केले. ‘आम्ही मुस्लिम आहोत, पण पाकिस्तानी नाही. आम्ही मुस्लिम आहोत, पण दहशतवादी नाही,’ असा प्रभावी संदेश देत पाकिस्तान समर्थित दहशतवादाचा निषेध नोंदविला. प्रात्यक्षिकाचे समीर शेडगे यांनी कौतुक केले.

फोटो कॅप्शन : अष्टमी येथील मेहबूब शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची फीत कापून उद्‍घाटन करताना नगराध्यक्षा वनश्री शेडगे, समवेत गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक राजेंद्र जैन, अहमद दर्जी, महेश कोलटकर, सीमा दामाद, अन्य नगरसेवक आणि मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com