‘एसआरए’चा कारभार होणार आणखी लोकाभिमुख

‘एसआरए’चा कारभार होणार आणखी लोकाभिमुख

Published on

‘एसआरए’चा कारभार होणार आणखी लोकाभिमुख
‘यूएक्सफोरजी’ प्रणालीची संकेतस्थळावर अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून हक्काचे पक्के घर मिळवून देणाऱ्या ‘एसआरए’चा कारभार आणखी लोकाभिमुख होणार आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या डिजिटल सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार भारत सरकारच्या यूएक्सफोरजी (युझर एक्सपिरियन्स फाॅर गव्हर्नमेंट) या विशेष प्रणालीची एसआरएच्या संकेतस्थळावर अंमलबजावणी करण्यात आली. या प्रणालीची अंमलबजावणी करणारे एसआरए प्राधिकरण हे पहिले शासकीय प्राधिकरण ठरले आहे. त्यामुळे आता नागरिकांना प्राधिकरणाशी संबंधित सर्व माहिती व सेवा घरबसल्या अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत.

सरकारी संकेतस्थळांचा वापर करताना नागरिकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना सोपे, स्पष्ट आणि सकारात्मक डिजिटल अनुभव देणे हा ‘यूएक्सफोरजी’ प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे एसआरए प्राधिकरणाच्या संकेतस्थळाची रचना आता अधिक सुटसुटीत, स्पष्ट आणि वापरकर्ता-केंद्रित करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्राधिकरणाशी संबंधित आवश्यक माहिती सहज शोधता येईल, अशा पद्धतीने संकेतस्थळाची रचना करण्यात आले आहे. विविध सेवा, अर्ज आणि त्यांच्या स्थितीची माहिती आता कमीत कमी क्लिकमध्ये उपलब्ध होणार असून, नागरिकांचा वेळ व श्रम दोन्ही वाचणार आहेत. हे संकेतस्थळ आता संगणकासोबतच मोबाईल आणि टॅब्लेटवरही तितक्याच प्रभावीपणे वापरता येणार आहे. अधिक चांगली वाचनीयता, सुलभ मांडणी आणि आधुनिक रचनेमुळे हे संकेतस्थळ सर्व स्तरांतील नागरिकांसाठी वापरण्यास सोपे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com