नागरी बँकांचे डिजिटायझेशन

नागरी बँकांचे डिजिटायझेशन

Published on

नागरी बँकांचे डिजिटायझेशन
‘भारत को ऑपाथॉन’ उपक्रम

मुंबई, ता. १० : नागरी सहकारी बँकांच्या डिजिटायझेशनला गती देण्यासाठी नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. नागरी सहकारी बँकांची शिखर संघटना नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आयआयएमए व्हेंचर्ससह ‘भारत को ऑपाथॉन २०२५’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत नागरी सहकारी बँकांना चांगल्या दर्जाच्या; पण कमी खर्चीक डिजिटल उपाययोजना लागू करण्याची संधी मिळेल, त्यामुळे या बँकांमधील डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढेल.
उपक्रमात स्टार्टअप, फिनटेक कंपन्या, टेक्नॉलॉजिस्ट, प्रॉडक्ट टीम आणि डेटा इनोव्हेटर्स हे नागरी सहकारी बँकांच्या गरजांनुसार आपल्या सोयीसुविधा सादर करतील. या उपक्रमातील साधन सुविधांचे ठरलेल्या निकषांनुसार मूल्यमापन केले जाईल. या निकषांमध्ये नवकल्पना, सुरक्षा, नियमांचे पालन आणि मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीची क्षमता आणि उपयुक्तता यांचा समावेश आहे. नागरी सहकारी बँकांमध्ये आर्थिक समावेशन खोलवर रुजवणे, कामकाजाची मानके सक्षम करणे आणि दीर्घकालीन विकासाला बळकटी देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी यांनी सांगितले.
कार्यक्रमातून ज्या साधन सुविधा निवडल्या जातील, त्यांना नागरी सहकारी बँकांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्याची आणि त्यांचा विस्तार करण्याची संधी मिळेल. तसेच बँकांना बीज भांडवल सहाय्यदेखील उपलब्ध करून दिले जाईल. सहभागी संस्थांसाठी कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे यांच्या माध्यमातून उपाययोजना सुधारण्यासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी सहाय्य केले जाईल, असे आयआयएम व्हेंचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका चोप्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com