मालमत्ता है, प्रचंड है!

मालमत्ता है, प्रचंड है!

Published on

मालमत्ता है, प्रचंड है!
उमेदवारांच्या मालमत्तेत भरमसाठ वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई महापालिकेच्या रणांगणात सर्वच पक्षांनी दिग्गज उमेदवार उतरवले आहेत. निवडणूक जिंकणे हाच निकष लावत बहुतांश पक्षांच्या उमेदवारांची आर्थिक बाजू भरभक्कम आहे. २०१७ची पालिका निवडणूक, २०२४ची विधानसभा निवडणूक लढलेले उमेदवारही आता महापालिकेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या तेव्हाच्या मालमत्तेच्या तुलनेत आताच्या मालमत्तेत मोठा फरक पडला आहे. ही वाढ म्हणजे ‘आरंभ है, प्रचंड है’ याप्रमाणेच ‘मालमत्ता है, प्रचंड है’ अशीच काहीशी आहे.
---
मालमत्तेच्या मूल्यवाढीने संपत्तीत वाढ
निवडणूक रिंगणातील अनेक उमेदवारांचे व्यवसाय आहेत. त्यामुळे मालमत्तेत भर पडली आहे. तसेच स्थावर मालमत्तेचे मूल्य वाढल्याने संपत्ती वाढल्याचे दिसते. मुंबईत घरांच्या किमतीत झालेली मोठी वाढ, हेही मालमत्तावाढीचे प्रमुख कारण आहे.
--------
मालमत्तेत अशी झाली वाढ
नाव प्रभाग संपत्ती याआधीची मालमत्ता वाढ
चंदन शर्मा प्रभाग १२२ ८४ कोटी २०१२ : ८.३० कोटी ७६ कोटी
मीनल तुर्डे प्रभाग १६६ ५५.१७ कोटी २०१२ : ७६ लाख ५४ कोटी
डॉ. सईदा खान प्रभाग १६८ १३.११ कोटी (२०१७ : ७.२६ कोटी ६ कोटी
रवि राजा प्रभाग १८५ १०.१२ कोटी २०१७ : ५.१२ कोटी ५ कोटी
मिलिंद वैद्य प्रभाग १८२ १३. ४९ कोटी २०१७ : २.१७ कोटी ११ कोटी
चौथीप्रसाद गुप्ता प्रभाग ३ २४.५६ कोटी २०१७ : ८.२५ कोटी १६ कोटी
संध्या दोषी प्रभाग १८ १९.२६ कोटी २०१७ : ३.२ कोटी १६ कोटी
संजय भोसले प्रभाग ९ १३.१० कोटी २०२४ : ११.८ कोटी २ कोटी
संजय घाडी प्रभाग ५ १२.८४ कोटी २०१७ : ३.१० कोटी ९ कोटी
शिल्पा सांगोरे प्रभाग १७ १२.८३ कोटी २०१७ : ३.७६ कोटी ८ कोटी
प्रीती दांडेकर प्रभाग १२ ११.३३ कोटी २०१७ : १.८७ कोटी १० कोटी
केशरबेन पटेल प्रभाग ८१ १९ कोटी २०१७ : २.२१ कोटी १७ कोटी
कॅरन डिमेलो प्रभाग १०१ २४ कोटी २०१७ : १८.५५ कोटी ६ कोटी
हेतल गाला प्रभाग ९७ २७ कोटी २०१७ : १७.९३ कोटी १० कोटी
समाधान सरवणकर प्रभाग १९४ ४६ कोटी २०१७ : ९.४३ कोटी ३५ कोटी
ज्योती खान प्रभाग १२४ २३ कोटी २०१७ : २.६१ कोटी २१ कोटी
श्रद्धा जाधव प्रभाग २०२ ४६ कोटी २०२४ : ४४ कोटी २ कोटी
विशाखा राऊत प्रभाग १९१ २१ कोटी २०१७ : १४ कोटी ७ कोटी
यामिनी जाधव प्रभाग २०९ १४ कोटी २०२४ : १० कोटी ४ कोटी
वर्षा कोरगावकर प्रभाग ६४ १५.३९ कोटी २०१७ : ८ कोटी ७ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com