विकासकामांबाबत मुख्यमंत्र्याची दिशाभूल

विकासकामांबाबत मुख्यमंत्र्याची दिशाभूल

Published on

मिरा-भाईंदरमध्ये वाकयुद्ध
विकासकामांवरून सरनाईक-मेहतांमध्ये जुंपली
भाईंदर, ता.११ (बातमीदार): मिरा-भाईंदरमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा रोड येथे शुक्रवारी (ता.९) जाहीर सभा घेतली होती. या सभेत मिरा भाईंदरमधील विकासकामांची घोषणा करण्यात आली. मात्र, अनेक विकासकामे आधीच झाली असल्याने खोटी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याची टिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहतांवर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले होते. या फलकांवरून आमदार नरेंद्र मेहता यांनी शरसंधान साधले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मते घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याची टीका त्यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. नालासोपारा येथील जाहीर सभेतही अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळी शहरातील फलक मुख्यमंत्र्यांना सांगूनच लावले असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील विकासकामांबद्दल खोटी माहिती नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचा पलटवार ही केला आहे.
-----------------------------------------
झालेल्या कामांची आश्वासने
- शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठीच्या क्लस्टर योजनेत बदल करुन मिनी क्लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील विविध समाजाची भवने बांधण्यासाठी मोफत जमिन देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, शहरात विविध समाजाची भवने बांधली आहे.
- दहिसर भाईंदर रस्त्याला २०२१ मध्ये मान्यता मिळाली आहे, झोपडपट्टी पूनर्वसन योजनाही लागू करण्यात आली आहे, मेट्रो व सूर्या पाणी योजनेसाठी नरेंद्र मेहतांच्या कंपनीमुळेच उशीर झाला आहे. परंतु, ही सर्व माहिती मेहता यांनी मुख्यमंत्र्यापासून लपवून ठेवल्याचा आरोप केला.
------------------------------------------
महायुती एकसंघ
केंद्रात, राज्यात भाजप व शिवसेना एकत्र आहेत. एकदिलाने काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत शिवसेनेवर कोणतीही टिका केली नाही. रविवारी (ता.११) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा मिरा रोड येथे होणार आहे. त्या सभेतही भाजपवर टीका केली जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com