पतंगांच्या मांज्याने संक्रांतीत पक्ष्यांचे जीव धोक्यात

पतंगांच्या मांज्याने संक्रांतीत पक्ष्यांचे जीव धोक्यात

Published on

पतंगाच्या मांजाने संक्रांतीत पक्ष्यांचे जीव धोक्यात
पतंगमुक्त मकर संक्रांत साजरी करण्याचे पक्षीप्रेमींचे नागरिकांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मकर संक्रांतीदरम्यान मोठ्या प्रमाणावर उडवण्यात येणाऱ्या पतंगांसाठी वापरल्या जाणाऱ्या काचेचा लेप असलेल्या चायनीज मांजामुळे दरवर्षी अनेक निष्पाप पक्षी जखमी होत असून, काहींचा मृत्यूही होत आहे. सण संपल्यानंतर रस्ते, झाडे आणि इमारतींवर पडून राहणारा मांजा अनेक वेळा पक्षी घरटी बांधण्यासाठी उचलतात. मात्र या मांजात अडकून त्यांचे पंख, मान आणि पायांना गंभीर जखमा होतात, अशी माहिती महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीच्या निशा कुंजू यांनी दिली.
गेल्या वर्षीपासून आतापर्यंत मुंबईतील पाच वेगवेगळ्या भागांत एकूण २० जखमी पक्ष्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मुलुंड, भांडुप, पवई, बोरिवली आणि मलबार हिल परिसरात आढळलेल्या जखमी पक्ष्यांवर तातडीने उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले. तसेच २०२५ या वर्षात आतापर्यंत २० जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यात आले असून, त्यांना पूर्ण बरे झाल्यानंतर पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
या उपचारांमध्ये तीन घारी, तीन घुबडे, एक चिमण्या आणि १३ कबुतरांचा समावेश आहे. या सर्व पक्ष्यांवर पशुवैद्य डॉ. मनीष पिंगळे आणि डॉ. राहुल मेश्राम यांनी उपचार केले. विविध स्वयंसेवी संस्था आणि प्राणी कल्याण संघटनांकडून सातत्याने जनजागृती मोहिमा राबवण्यात येत असल्यामुळे जखमी पक्ष्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. मात्र काही भागांत अद्याप पतंगबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी जखमी होत असल्याचे वास्तव असल्याचे कुंजू यांनी नमूद केले. त्यामुळे नागरिकांनी सण साजरा करताना अधिक जबाबदारी आणि संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मकर संक्रांत ही आनंदाची आणि उत्सवाची वेळ आहे. मात्र निसर्गाचे नुकसान करून सण साजरा होऊ नये. पतंगाशिवाय संक्रांत साजरी केली, तर निसर्ग आणि मानव यांच्यातील समतोल राखला जाईल आणि असंख्य पक्ष्यांचे प्राण वाचू शकतील.
- सुनिष सुब्रमण्यन, मानद वन्यजीव रक्षक

जखमी पक्ष्यांची एकूण संख्या : २०
३ घारी, ३ घुबडे, १ चिमणी, १३ कबुतरे

जखमी पक्षी आढळलेले परिसर
मुलुंड, भांडुप, पवई, बोरिवली, मलबार हिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com