आगीसारखं जळू नका, फुलासारखं जगा

आगीसारखं जळू नका, फुलासारखं जगा

Published on

आगीसारखं जळू नका, फुलासारखं जगा
रस्ता सुरक्षेसाठी श्रेयस तळपदे यांचा ‘पुष्पा’स्टाइल सल्ला
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : सिग्नल दिसल्यावर ‘रुकेगा साला’! असा ‘पुष्पा’स्टाइल संदेश देत माणसाला आयुष्य एकदाच मिळते, त्यामुळे आगीसारखे स्वतःला जाळून घेण्यापेक्षा फुलासारखे आनंदी आयुष्य जगण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांनी केले. ठाणे शहर पोलिस वाहतूक विभागातर्फे आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी (ता. १०) राम गणेश गडकरी रंगायतन येथे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

श्रेयस तळपदे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील एका अपघाताची आठवण सांगत तरुणांना सावध केले. ‘सिग्नल तोडावासा वाटल्यास क्षणभर थांबून आपल्या कुटुंबाचा विचार करा,’ असा भावनिक सल्लाही त्यांनी दिला. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुरक्षित प्रवासासाठी ‘मनाचा ब्रेक’ लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नव्या पिढीने वाहतुकीचे नियम पाळणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट आणि आरएसपीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवे उपक्रम
१. कॅम्पस विथ सीट बेल्ट अँड हेल्मेट : गृहनिर्माण सोसायट्या आणि कार्यालयांमध्ये हेल्मेट व सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्यासाठी या विशेष मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला.
२. पथनाट्य सादरीकरण : रस्ता सुरक्षा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या उल्हासनगरच्या एस.एस.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले.
३. मार्गदर्शन : वाहतूक पोलिसांचे ‘हातवारे’ आणि संकेतांचे महत्त्व कवायतीद्वारे समजावून सांगण्यात आले.
४. पुरस्कार वितरण : शाळा-महाविद्यालयांमधील विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com