आरपीआयच्या नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन

आरपीआयच्या नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष, तसेच पनवेल महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त निरीक्षक व प्रभारी नरेंद्र गायकवाड यांनी नऊ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले आहे. पक्षाचा आदेश न मानणे, पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षशिस्त मोडणे, संघटनात्मक कामकाजास बाधा निर्माण करणे, पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्षांविषयी आक्षेपार्ह विधाने करणे, तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेणे, या गंभीर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली.

पक्ष संघटना मजबूत ठेवणे, कार्यकर्त्यांमध्ये शिस्त व एकात्मता राखणे, तसेच जनतेसमोर पक्षाची सकारात्मक प्रतिमा कायम ठेवणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत संबंधित व्यक्तींना कोणतेही पक्षीय पद अथवा जबाबदारी राहणार नाही. तसेच सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून ती प्राप्त झाल्यापासून चार दिवसांच्या आत लेखी खुलासा न केल्यास पक्षातर्फे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे नरेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यांना नोटीस...
मोहनिश गायकवाड (प्रभारी, पनवेल महानगर क्षेत्र), प्रभू जाधव (खारघर), विजय गायकवाड (तळोजा), प्रवीण जाधव (पनवेल), शरद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), नवीन सोनावणे (कळंबोली), राजू इंगळे (खांदा कॉलनी), संतोष सोनकांबळे (खारघर), सूरज कदम (कळंबोली) यांचे निलंबन करण्यात आले असून पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून हिरामण गायकवाड, पनवेल तालुकाध्यक्ष विजय पवार, सुनील सप्रे, जयप्रकाश पवार, जिवक गायकवाड, अशोक गोतारणे, नितीन मोरे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com