दिवस-रात्र अंधाराशी गठ्ठी

दिवस-रात्र अंधाराशी गठ्ठी

Published on

दिवस-रात्र अंधाराशी गट्टी
वाणगावमध्ये विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
तारापूर, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील वाणगाव, साखरे, कापशी, गोवणे, आसणगाव परिसरातील गावांमध्ये दररोज वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे दिवस-रात्र अंधारात राहण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वीजपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक वेळा तक्रार करूनही समस्येकडे लक्ष देण्यासाठी बोईसर, वाणगाव वीज विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाणगाव येथे महावितरण शाखाचे कार्यालय असून, कंपनीचे उपविभागीय कार्यालय बोईसर येथे आहे, तरी वीज समस्या जैसे थे आहे. दिवसातून अनेक वेळा वीज चालू-बंद होण्याचा प्रकार कित्येक दिवसांपासून सुरू आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांकडून वीज शुल्कासह अनेक प्रकारचे शुल्क उकळते आहे. देयके भरण्यास उशीर झाला तर मात्र जोडणी कापली जाते. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे.
-------------------------------------
अडचणींशी सामना
- गावातील विद्युत रोहित्रे मोडकळीस आली आहेत. अनेक वाहिन्या जुन्या झाल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. जोराचा वारा आला तर लोंबकळलेल्या विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडित होतो.
- वाणगाव महावितरण शाखेअंतर्गत जवळपास ८० ते ९० किलोमीटर परिसर येतो. तांत्रिक बाबीने वीज बंद झाली तर काही भागांमध्ये झाडेजुडपे जास्त प्रमाणात असल्याने रात्रीच्या वेळी जात येत नाही. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही काळ लागतो.
----------------------------
बोईसर, वाणगाव महावितरण विभागात वेळोवेळी तक्रार करूनही कोणतीही तत्परता दाखवत नाही. वीज गेली तर चार ते आठ तास येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- रमेश तांबडा, स्थानिक तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com