डिसेंबरमध्य मद्यविक्रीचा विक्रमी उच्चांक
डिसेंबरमध्य मद्यविक्रीचा विक्रमी उच्चांक
बियरला तळीरामांची पसंती; वाईनची विक्री मात्र घसरली
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ११ : रायगड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात मद्यविक्रीने विक्रमी उच्चांक गाठले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार या महिन्यात तब्बल ४३ लाख २७ हजार ५२५ बल्क लिटर मद्याची विक्री झाली आहे. यामध्ये बियरची विक्री सर्वाधिक झाल्याचे स्पष्ट झाले असून, देशी व विदेशी दारूच्या तुलनेत बियरला मद्यपींची मोठी पसंती मिळाली आहे. दुसरीकडे वाईनच्या विक्रीत मात्र लक्षणीय घट नोंदवली गेली आहे.
डिसेंबर महिन्यात नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, कर्जत, खोपोली यांसह समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, रिसॉर्ट, कॉटेज, हॉटेल आणि रेस्टॉरंट पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेली होती. अंदाजे १० लाखांहून अधिक पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला भेट दिल्यामुळे साहजिकच मद्यविक्रीत मोठी वाढ झाली.
दरम्यान, विदेशी दारूच्या किमतीत झालेल्या ३० टक्क्यांहून अधिक वाढीचा थेट परिणाम विक्रीच्या स्वरूपावर झाली आहे. पूर्वी सुमारे ६५० रुपयांना मिळणारी विदेशी दारूची बाटली आता ९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच प्रत्येक क्वॉर्टरमागे सुमारे ६० रुपयांची दरवाढ झाल्याने अनेक मद्यपींनी विदेशी दारूऐवजी तुलनेने स्वस्त, थंड आणि सहज उपलब्ध असलेल्या बियरकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिणामी बियरची विक्री विक्रमी पातळीवर पोहोचली असून, वाईनची मागणी अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. यासंदर्भात माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोल्हे यांनी सांगितले, की वाढते पर्यटन, सण-समारंभांचे वातावरण आणि विदेशी दारूच्या वाढलेल्या किमती या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यात मद्यविक्रीचा कल बदलताना दिसत आहे. भविष्यातही पर्यटन हंगामात बियरची विक्री अधिक राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
....................
डिसेंबरमधील मद्यविक्री (बल्क लिटरमध्ये)
• देशी मद्य – ९,५१,३८१
• विदेशी मद्य – ९,१४,४२६
• बियर – २४,९६,९६०
• वाईन – ६४,७५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

