निवडणूक रणधुमाळीत प्रदूषणाचा विसर

निवडणूक रणधुमाळीत प्रदूषणाचा विसर

Published on

निवडणूक रणधुमाळीत प्रदूषणाचा विसर
ठाणेकरांच्या आरोग्याकडे उमेदवारांचे दुर्लक्ष
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा जोरात उडत आहे; मात्र शहरातील प्रदूषणाचा मुद्दा गायब झाला आहे. ठाण्यात दरडोई असलेली वाहनांची आणि सुरू असलेल्या विविध कामांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे. वाहतूक कोंडीसोबतच ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेले आहे; मात्र इतर समस्यांसोबतच वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झालेली असतानाही निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांकडून या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रचारात ठाणेकरांना ठोस आश्वासन दिलेले दिसत नाही. त्यामुळे ठाणेकरांची प्रदूषणमुक्तीची समस्या सुटणार की नाही, हा प्रश्न मतदारांना पडला आहे.

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत ठाणेकर मतदार १३१ नगरसेवकांना निवडून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेमध्ये पाठवणार आहेत. त्यासाठी ६४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवाराकडून ठाणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी जाहीरनामे आणि आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे; मात्र या आश्वासनांमध्ये ठाणेकरांना भेडसावणाऱ्या प्रदूषणाबाबत मात्र उमेदवाराकडून ठोस भूमिका घेतलेली दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाच्या समस्येपासून ठाणेकरांची सुटका कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरात ८० हजारहून अधिक रिक्षा धावत आहेत. तर इतर वाहनांची संख्या २५ लाखांहून जास्त आहे. रोज रस्त्यांवर धावणाऱ्या या वाहनांच्या धुरामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड वायू हवेत मिसळत आहे. सोबतच शहरात विविध ठिकाणी इमारती आणि रस्त्यांची कामे सुरू असल्याने शहरावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. या दोन्ही समस्या ठाणेकरांचे आरोग्य बिघडविण्यात कारणीभूत ठरत आहेत; मात्र असे असतानाही राजकीय पक्ष आणि उमेदवारांना या समस्यांचा विसर पडलेला दिसत असल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

ठाण्यातील घोडबंदर मार्ग परिसर सर्वाधिक प्रदूषण पसरविणारा भाग बनला आहे. या परिसरातून जाणाऱ्या मार्गावर दिवस-रात्र जड-अवजड वाहनांमधून निघणाऱ्या धुराचा त्रास होत आहे.

प्रदूषण मोजणारी अवघी दोन यंत्रे
ठाणे महापालिकेच्या हद्दीत उपवन आणि कासारवडवली परिसरात दोन प्रदूषण मापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या शहरात आम्ही दोनच यंत्र उपलब्ध असल्याने हवेतील प्रदूषणाची खरी आकडेवारी समोर येताना अडचणी येत आहेत.

निवडणूक प्रचाराच्या काळातील प्रदूषण
४ जानेवारी - ११९
५ जानेवारी - ११३
६ जानेवारी - ११८
७ जानेवारी - १११
८ जानेवारी - १५९
९ जानेवारी - ११०
१० जानेवारी - १०८
११ जानेवारी - १०८
(प्रदूषण एक्यूआयमध्ये)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com