‘घरोघरी संवाद’मुळे समस्यांची नोंद
खारघर, ता. ११ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार लीना गरड यांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. ‘घरोघरी संवाद’ या उपक्रमांतर्गत त्या नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासाबाबतच्या सूचना समजून घेत असल्यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
पनवेल महापालिकेच्या खारघरमधील प्रभाग पाचमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून लीना गरड, अनिता भोसले, उत्तम मोरबेकर आणि सोमनाथ म्हात्रे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या चारही उमदेवारांना महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. घरोघरी भेटीदरम्यान लीना गरड यांनी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, तसेच महिलांच्या सुरक्षेसारख्या विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. प्रत्येक घरात थांबून शांतपणे संवाद साधत त्या समस्या नोंदवून घेत असून, निवडणूक जिंकल्यानंतर प्राधान्याने उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत असल्याचे दिसून येत आहेत.
स्थानिक प्रश्नांची सोडवणूक स्थानिक पातळीवरच होते. नगरसेवक हा लोकांचा थेट प्रतिनिधी असतो, त्यामुळे पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण संवाद हाच विकासाचा खरा मार्ग आहे, असे लीना गरड यांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट करत सांगितले.
प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणार!
महिलांसाठी स्वयंरोजगार, तरुणांसाठी क्रीडा व कौशल्य विकास केंद्रे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. या घरोघरी संवाद मोहिमेमुळे प्रचाराला वेग आला असून, कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटीमुळे विश्वास वाढल्याची भावना व्यक्त केली आहे. येत्या दिवसांत ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार लीना गरड यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

