निवडणूक प्रचारात बच्चे कंपनीचा वापर

निवडणूक प्रचारात बच्चे कंपनीचा वापर

Published on

निवडणूक प्रचारासाठी बच्चेकंपनीचा वापर
उपनगरांतील गल्लीबोळात मुलांच्या हातात पक्षांचे झेंडे
मुंबई, ता. ११ : शालेय विद्यार्थी आणि विशेषतः पाच ते १४ वर्षांखालील मुलांचा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्रास वापर केला जात आहे. यात अनेक प्रमुख राजकीय पक्षांसोबत अपक्षांचाही समावेश असल्याचे चित्र मुंबई उपनगरांतील अनेक वस्त्यांमध्ये दिसून येत आहे.

केंद्र सरकारच्या बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) कायदा, १९८६ (सीएलपीआर कायदा) नुसार, १४ वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती किशोरवयीन मुलगा म्हणून गणली जाते. यामुळे या वयातील मुलांना कोणत्याही घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक इत्यादी कामांसाठी ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद यात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध प्रभागांमध्ये विविध पक्षांकडून प्रचार करण्यासाठी १४ वर्षे वयाखालील मुलांच्या हातात झेंडे दिले जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यात कोणी आक्षेप घेऊ नये, म्हणूनही अनेक पक्षांच्या प्रतिनिधींकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी लहान मुलांचा चुकून, अनवधानाने वापर होत असेल तर तो तत्काळ थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनी व्यक्त केली.

..
शिक्षक संघटनांची चिडीचूप
मुंबई शहरातील काही प्रभागांचा अपवाद वगळता उपनगरांतील अनेक प्रभागांमध्ये किशोरवयीन मुलांचा निवडणूक प्रचारासाठी सर्रास वापर केला जात आहे. गल्लीबोळातून या मुलांच्या हाती पक्षांचे चिन्ह, झेंडे हाती देऊन घोषणा देत फिरवले जात आहे. इतर वेळी मुलांवरील अभ्यासाच्या ओझ्यासाठी ओरड करणाऱ्या एकाही शिक्षक, संस्थाचालक संघटनांनी हे मुंबईतील चित्र पाहून याविरोधात आवाज का उठवला नाही, असा सवाल केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com