

फरशीचा तुकडा मारल्याने प्रवासी जखमी
कल्याण रेल्वेस्थानक परिसरात घटना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ ः मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकण्यास विरोध केल्याने एका प्रवाशाला फरशीचा तुकडा मारून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सोनावणे (वय ३२) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे.
राहुल सोनावणे शुक्रवारी इंदोर-दौंड एक्स्प्रेसने उल्हासनगर येथील बहिणीकडे जात असताना हा प्रकार घडला. सिग्नलमुळे एक्स्प्रेस कल्याण रेल्वेस्थानकाच्या परिसरात थांबली. हर्षद मोरे या प्रवाशाने मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावली होती. कर्णकर्कश आवाजामुळे प्रवासी त्रस्त झाले होते. त्यामुळे राहुल सोनावणे यांनी त्याला मोबाईलवरील गाण्याचा आवाज कमी करण्याची सूचना केली. मात्र ‘तू मला सांगणारा कोण?’ असा प्रतिप्रश्न त्याने केला. ‘कल्याण स्टेशनवर ये, मग तुला बघतो,’ अशी धमकीही त्याने दिली.
त्यानंतर गाडी कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावर आली. राहुल गाडीतून उतरताच हर्षद मोरे याने अचानक त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला. त्यामुळे राहुल रक्तबंबाळ झाला. हल्ला करून तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना राहुल याने त्याला पकडून ठेवले. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हर्षद मोरे (वय २४) हा कळवा येथील राहणारा असून सफाई कामगार आहे. राहुल सोनावणे याला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी हर्षद मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कल्याण लोहमार्ग पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.