मुंबई
या शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर एफआयआर दाखल
शाळेच्या ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयांच्या आस्थापनावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत केलेली आहे. या निवडणूक कामकाजाकरिता पवार पब्लिक स्कूल, पलावा डोंबिवली (पूर्व) या शाळेतील एकूण ८० कर्मचाऱ्यांस निवडणूक कामकाजाकरिता आदेश बजावण्यात आले होते. या शाळेचे कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी पवार पब्लिक स्कूल, पलावा डोंबिवली या शाळेतील ८० कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली, अशी माहिती महापालिका उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली.

