मिरा भाईंदर महापालिकेवर भगवाच फडकणार
मिरा भाईंदर महापालिकेवर भगवाच फडकणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये झालेल्या विकासकामांचे श्रेय शिवसेनेचेच आहे. शहराचा प्रचंड विकास करायचा आहे. विकासाचा वेग असाच ठेवायचा असेल, तर महापालिकेवर भगवाच फडकला पाहिजे आणि तो फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा रोड येथे व्यक्त केला.
मिरा भाईंदर महापलिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून लढत असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे मिरा रोड येथे आले होते. या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, संजय निरुपम आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई व ठाण्याइतकेच मिरा-भाईंदरवरही प्रेम होते. सामान्य माणसाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. अशक्य हा शब्द आमच्या शब्दकोशातच नाही. राज्यात अन्य ठिकाणी युती झाली, परंतु मिरा- भाईंदरमध्ये झाली नाही. आमच्यासोबत कोणीही आले नाही तरी हरकत नाही. विकासाच्या विरोधात असलेल्यांचा जनताच करेक्ट कार्यक्रम करेल, असा टोला शिंदे यांनी या वेळी लगावला.
१,८०० कोटींहून अधिक निधी
मिरा-भाईंदरला गेल्या तीन वर्षांत १,८०० कोटींहून अधिक निधी दिला. त्यातून अनेक विकासकामे झाली. पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर, एसआरए यातील सर्व अडचणी दूर केल्या आहेत. आणखी निधी लागला तरी तो देण्यात येईल. शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलायचा आहे. मेट्रोमुळे मिरा-भाईंदरचा मुंबईशी थेट संपर्क होणार आहे. आम्ही फक्त घोषणा करीत नाही तर काम करून दाखवतो. शहरात अजूनही काही समस्या आहेत. मात्र त्याही निश्चित कालावधीत पूर्ण केल्या जातील. महापालिकेत परिवर्तन घडवायचे आहे, बदल घडवायचा आहे, म्हणूनच महापालिकेवर भगवा फडकणे आवश्यक आहे. असे शिंदे यांनी सांगितले.
गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महराष्ट्र हे पहिले राज्य आहे व देशातला पहिला मुख्यमंत्री आहे याचा आपल्याला अभिमान आहे. डॉक्टर नसतानाही २०२२ला मोठे ऑपरेशन केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आम्ही चालत आहोत. या विचारधारेशी प्रतारणा शक्य नाही, असेही शिंदे यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

