मोतीलाल ओसवाल सदर, १३ जानेवारी २०२६

मोतीलाल ओसवाल सदर, १३ जानेवारी २०२६

Published on

मोतीलाल ओसवाल सदर, १३ जानेवारी २०२६

ग्रोव : लक्ष्य - १८५

ग्रोव ही कंपनी छोट्या गुंतवणूकदारांची भारतातील सर्वात मोठे ब्रोकरेज व्यासपीठ झाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या वाढीची मॉडेल राबवून बाजारात अग्रगण्य स्थान मिळवले आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी २६ ते २७ टक्क्यांचा मोठा ग्राहकवाटा मिळवला आहे. त्यांनी कमिशन न घेणाऱ्या म्युच्युअल फंड व्यवसायापासून सुरुवात करून आता पूर्णपणे सर्व सेवा देणारे संपत्तीविषयक व्यासपीठ म्हणून स्वतःचे स्थान बळकट केले आहे. यात फिस्डममार्फत देणाऱ्या ब्रोकिंग, मार्जिन ट्रेड फॅसिलिटी, कमोडिटी, संपत्ती व्यवस्थापन, कर्ज (लोन अगेन्स्ट सेक्युरिटी/म्युच्युअल फंड) या सेवांचा समावेश आहे. त्यांनी आपले ८० टक्के ग्राहक कायम ठेवल्यामुळे ग्राहक मिळवण्याचा खर्च त्यांचा कमी राहिला आहे. त्यांची व्याप्ती वाढली तसा त्याचा फायदाही त्यांना मिळाला. उच्च प्रतीचा महसूल देणाऱ्या शाखा म्हणजे मार्जिन ट्रेड फॅसिलिटी, कर्ज, संपत्ती यांच्यावर ते वाढता भर देत आहेत. उतार-चढाव असलेल्या ब्रोकिंग उत्पन्नावरील भर त्यांनी कमी केल्याने त्यांना दीर्घकालीन उत्पन्नाची शाश्वती मिळाली आहे. अंतर्गत तांत्रिक सेवेचे ठाम पाठबळ तसेच उच्चभ्रू ग्राहकांकडून मिळणारा वाढता सरासरी महसूल आणि अद्यापही कमी नागरिकांचा प्रवेश झालेल्या भांडवली बाजार परियंत्रणेत वाढता वावर असल्याने ग्रोव ही कंपनी सातत्यपूर्ण नफावाढ, चक्रवाढ दराने वाढते उत्पन्न आणि मूल्यांकनाची पुनर्रचना करण्यास सज्ज आहे.

ए. यू. स्मॉल फायनान्स बँक : लक्ष्य - १,१५०

ए. यू. स्मॉल फायनान्स बँक ही वाढीवर भर देत कामकाज करण्याचे उत्तम प्रात्यक्षिक दाखवत आहे. कर्ज देण्यातील वाढ आणि ठेवी जमवण्यातील स्थिरता यामुळे त्यांना हा फायदा मिळत आहे. एकंदर बँकिंग क्षेत्रातील कर्ज देण्याच्या वाढीपेक्षा या बँकेचा दिलेल्या कर्जांच्या वाढीचा दर जास्त आहे. त्यातून छोटे कर्जदार आणि एमएसएमई यांना कर्ज देण्याचा व्यवसाय वाढवण्याची त्यांची क्षमता दिसते. तसेच भांडवली पर्याप्तता आणि रोकड सुलभता यावर भर दिल्याने त्यांनी ताळेबंदाचे केलेले चांगले व्यवस्थापनही दिसून येते. दिलेल्या कर्जात वाढ होत असताना त्यांच्या ठेवीही वेगाने वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकंदर ताळेबंदाचीही चांगली वाढ होत आहे. ‘कासा’मध्ये संथ गतीने वाढ होत असून त्यामुळे कर्ज व ठेवी यांच्या प्रमाणातही नियंत्रितरीत्या वाढ होत आहे. ही वाढ होत असल्याने आणि कर्जांनाही मागणी असल्याने बँकेचे व्यवस्थापन आपले भांडवल योग्य तिथे गुंतवू शकते व त्यासाठी त्यांना भांडवलाची चणचणही भासत नाही. बँकेकडे वेगवेगळ्या मार्गातून ठेवींचे स्रोत येत असल्याने त्यांची अवस्था चांगली आहे. एकंदरीत पाहता ए. यू. स्मॉल फायनान्स बँकेचा वाढीचा आलेख, शिस्तबद्ध कामकाजामुळे तसेच प्रमुख क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवल्याने आणि सुयोग्य ताळेबंदामुळे समर्थ आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या सरासरी वाढीपेक्षा त्यांनी आपली वाढ जास्त ठेवली आहे. तसेच आपल्या व्यवसायाची खोली आणि वेगवेगळ्या प्रकारचा कर्जपुरवठा मध्यम कालावधीसाठी हळूहळू वाढवत नेला आहे.

कोटक महिंद्र बँक : लक्ष्य २,५००

कोटक महिंद्र बँकेने आपल्या ताळेबंदाची सुनियोजित वाढ, भरपूर ठेवी आणि धोक्याचे शिस्तबद्ध व्यवस्थापन यांच्या साहाय्याने, व्यवसाय चक्र कसेही असले तरी मालमत्तेवर दोन टक्के परतावा मिळण्याची अवस्था आणली आहे. देणाऱ्या कर्जामध्ये बँक दरवर्षी दीड ते दोन पट वाढ करण्याबाबत दक्ष असून सुरक्षित छोटी कर्जे, एसएमई कर्जे, कृषी कर्ज आणि ट्रॅक्टर कर्जांच्या साहाय्याने बँक ही वाढ साधत आहे. तर मोठी कर्जे आणि बिगर सुरक्षित कर्जे निवडकच ठेवून त्यातूनही नफा मिळेल, याची काळजी घेतली जात आहे. रोख रकमेची तैनाती आणि बँकांमधील परस्पर व्यवहारांच्या मर्यादांमुळे निव्वळ व्याजाचे उत्पन्न नजीकच्या भविष्यकाळात ठरावीक मर्यादेतच राहण्याची अपेक्षा आहे; पण मुख्य बाबींची नफाक्षमता स्थिर राहणार आहे आणि व्याजदर कपातीमुळे ठेवींचे व्याजदर हळूहळू कमी होत असल्याने, हा मुख्य नफा आहे तसाच राहील. ग्राहकांना दिलेल्या कर्जाचा दर्जा चांगला राहिला असून मागील वर्षात असुरक्षित कर्ज वाढली होती; मात्र आता ते प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे मध्यम कालावधीसाठी त्यांच्या कर्जाचा खर्च अर्धा ते पाऊण टक्क्यांच्या घरात राहील. मोठ्या कर्जांचे वाढते प्रमाण, चांगले कासा प्रमाण आणि डिजिटल कामकाजाचा होणारा फायदा यामुळे त्यांच्या शाखांमध्ये वाढ होत असून त्या प्रमाणात त्यांना कर्मचारी वर्ग नेमण्याची गरज नाही. त्यामुळे स्थिर उत्पन्न आणि शिस्तबद्ध खर्च हे त्यांना साधता येत आहे. ज्यादा भांडवल, भिन्न भिन्न क्षेत्रातील उप कंपन्यांचे उत्पन्न आणि आक्रमक वाढीपेक्षा चांगल्या कामकाजावर भर यामुळे कोटक महिंद्र बँक ही मध्यम कालावधीसाठी उच्च दर्जाची वाढ देणारी आणि सातत्यपूर्ण नफा दाखवणारी आणि परताव्याचे प्रमाण सुधारणारी बँक ठरली आहे.

टायटन : लक्ष्य ५,०००

टायटन कंपनी आपला दागिन्यांचा व्यवसाय निवडक पद्धतीने वाढवत आहे. प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांचा बीयॉन हा ब्रँड बाजारात आणून त्यांनी इतरांचे फार लक्ष नसलेल्या या क्षेत्रात शिरकाव केला आहे; मात्र त्यांच्या नैसर्गिक हिऱ्यांच्या व्यवसायाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. ही कृती धोरणात्मकरीत्या योग्य वेळी केली आहे. कारण प्रयोगशाळेतील हिऱ्यांच्या कमी होत असलेल्या किमती आणि सोन्याचे वाढते भाव यामुळे हे दागिने सर्वांना परवडत आहेत. विशेष करून तरुण आणि फॅशनवर भर देणाऱ्या ग्राहकांमध्ये ते दागिने लोकप्रिय आहेत आणि एकंदरीतच भारतात कमी मूल्याच्या सोन्याच्या दागिन्यांचा शिरकाव अजून फार झाला नाही. त्यांनी प्रयोगशाळेतील हिऱ्यांना एका वेगळ्या लाइफस्टाइल ब्रँडमध्ये निर्मित करून त्यांच्या किमतीही जास्त ठेवल्याने, या क्षेत्रातील वाढत्या मागणीचा फायदा घेऊन टायटन प्रथमच असे दागिने खरेदी करणाऱ्यांवर भर देत आहेत. तसेच नामांकित कंपन्यांचे ग्राहक या क्षेत्राकडे ओढण्याचा त्यांचा प्रयत्न नाही. वेगवेगळ्या माध्यमातून विक्रीचा केलेला प्रयत्न, मर्यादित पद्धतीनेच दुकानांची संख्या वाढवण्याचा निर्णय आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यातूनच मोठ्या प्रमाणावर विक्री वाढवण्याआधी त्या व्यवसायाचे अर्थशास्त्र जाणून घेऊन मगच नियोजनबद्ध पद्धतीने त्या क्षेत्रात प्रवेश करण्याचे त्यांचे धोरण दिसते. महत्त्वाचे म्हणजे हिऱ्यांची अस्सलता ओळखण्यासाठी टायटनने केलेली गुंतवणूक आणि डीबीअर्ससह त्यांनी केलेली भागीदारी यातून त्यांचा नैसर्गिक हिऱ्यांवरील विश्वास प्रतीत होतो. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा फायदा घेण्याचा त्यांचा कलही दिसून येतो. टायटनच्या मोठ्या ग्राहकवर्गाचा फायदाही त्यांना मिळत असून त्यामुळे व्यवसाय वाढवताना त्यांच्यापुढे धोकेही फार नाहीत. त्यामुळे बीयॉन हा दीर्घकालीन मूल्यवर्धनाचा ब्रँड बनवून टायटनने आपल्या दागिने परियंत्रणेत वाढ करून ब्रँडची शुद्धता आणि उत्पन्नाची दृश्यमानता वाढवली आहे.

झायडस वेलनेस : लक्ष्य - ५७५

झायडस वेलनेस ही आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील वैविध्यपूर्ण सेवा प्रदाता म्हणून आपली स्थिरपणे वाढ करत आहे. ग्राहक आरोग्याच्या विविध क्षेत्रात म्हणजेच साखरेऐवजी घेण्याच्या पावडरी, ग्लुकोज पावडर, त्वचेची निगा राखणारी क्रीम, विशेष अन्न, घामोळ्यावर वापरायची पावडर आणि पोषक शीतपेय या क्षेत्रात त्यांना अग्रगण्य स्थान मिळाले आहे. नुकतेच त्यांनी नॅचरेला (राईटबाईट मॅक्स प्रोटीन) आणि कंफर्ट क्लिक यांचे अधिग्रहण केले आहे. वेगाने वाढणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रोटीन, पोषक द्रव्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि आंतरराष्ट्रीय डिजिटल मार्केट या क्षेत्रावर भर देऊन त्यांनी आपल्या जुन्या प्रमुख ब्रँडखेरीज अन्य क्षेत्रातही दीर्घकालीन वाढीचा ठसा उमटवला आहे. साऱ्या जगात सध्या असलेल्या आरोग्य आणि ग्राहक सेवा या क्षेत्रातील कलानुसारच त्यांचे भागभांडवल संलग्न आहे. तसेच शास्त्रशुद्ध नवकल्पना आणि शुगर फ्री ग्रीन, ग्लुकॉन-डी, ॲक्टिव्होरस आरटीडी आणि इम्युनोव्होल्ट यासारखी वेगवेगळे उत्पादने बाजारात आणणे, यामुळे त्यांची विक्रीही वाढत असून त्यांच्या ब्रँडचे अस्तित्वही ठळकपणे दिसून येत आहे. त्यांच्या कामकाजाच्या क्षमताही सक्षम असून वेगवेगळ्या प्रकारच्या वितरण यंत्रणेमुळे विक्री वाढत आहे. त्यांचे वितरण जाळेही मोठे असून प्रत्यक्ष कर्मचारी वर्ग लक्षणीय आहे. तसेच त्यांच्या गोदामांची संख्याही चांगली असून ती विविध ठिकाणी मोक्याच्या जागेवर आहेत. तसेच नेहमीच्या विक्री केंद्राप्रमाणेच डिजिटल चॅनेलचाही फायदा त्यांना विक्रीमध्ये होतो. त्यांची परंपरागत उत्पादनांची विक्री स्थिर असून नव्या उत्पादनांच्या विक्रीतील वाढही चांगली आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी असलेल्या प्रमुख क्षेत्रात त्यांची चांगली उपस्थिती असल्याने झायडस वेलनेस ही १५० अब्ज रुपयांच्या या ग्राहक क्षेत्रात चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो देत आहे. त्याचबरोबर त्यांची वाढीची क्षमता चांगली असून नफा क्षमतेवर आधारित मूल्यवर्धनालाही चांगला वाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com