शेतमाल विक्रीसाठी फरपट
शेतमाल विक्रीसाठी फरपट
विक्रमगडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) ः शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती योजना राबवते; पण विक्रमगड तालुक्याचा योजनेत समावेश नसल्याने शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची फरपट सुरू आहे.
विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांवर किंवा वाडा, विरार, वसई, पालघर, मुंबईसारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागत आहे, त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. तसेच दलालांमार्फत होणाऱ्या व्यवहारांमुळे मालाचा योग्य भाव मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, अलीकडच्या काळात विक्रमगड तालुक्यात भाजीपाला, फळबागा, कलिंगड, भेंडी, गवार, काकडी, दोडका, टोमॅटो, मिरची पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत; पण अधिकृत बाजारपेठ नसल्याने कमी भावात शेतमाल विकावा लागत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-------------------------------
शेतकऱ्यांची गैरसोय
विक्रमगड तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली, तर शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. थेट लिलाव पद्धतीने शेतमालाची विक्री होईल, योग्य बाजारभाव मिळेल, वजनात व दरात फसवणूक थांबेल, तसेच व्यवहारात पारदर्शकता येईल. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढून अधिकाधिक शेतकरी भाजीपाला व फळ उत्पादनाकडे वळतील. परिणामी, रोजगारनिर्मिती होऊन तालुक्यातील स्थलांतर थांबेल.
--------------------------------
आम्ही फळे, भाजीपाला पिकवतो; पण योग्य बाजारपेठ नसल्याने मालाला भाव मिळत नाही. अनेक वेळा तोट्यात विक्री करावी लागते. तालुक्यातच बाजार समिती झाली, तर आमचा माल योग्य दराने विकता येईल.
- राजाराम ढोणे, शेतकरी, विक्रमगड
़़़़़़़़ः--------------------------------
विक्रमगड तालुक्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. हा निर्णय झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
- जगदीश दोंदे, तालुका कृषी अधिकारी, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

