वाहतूक नियमजागृती रॅलीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती
रॅलीद्वारे नागरिकांमध्ये वाहतूक नियम जनजागृती
बोईसर, ता. १३ (वार्ताहर) : जिल्हा वाहतूक शाखा, पालघर अंतर्गत बोईसर येथे ३७ व्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत नियमजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सेवाश्रम शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने सेवाश्रम शाळा ते नवापूर रोड या मार्गावर ही रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “वेगाने वाहन चालवू नका”, “वाहन चालवताना मोबाईल वापर टाळा”, “झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा” व “वाहतूक नियम पाळा - सुरक्षित प्रवास करा” अशा घोषणांद्वारे जनजागृती केली. या वेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप नागरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे ते म्हणाले.

