पोलिसांची ‘रिअल-टाइम’ तयारी

पोलिसांची ‘रिअल-टाइम’ तयारी

Published on

दंगलखोरांना पोलिसांचा कडक इशारा
उल्हासनगरमध्ये ‘रिअल-टाइम’ ड्रिलद्वारे शक्तिप्रदर्शन
उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : निवडणुकीच्या काळात उद्भवू शकणारा संभाव्य जातीय तणाव किंवा जमावाचा हिंसाचार रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी आपली ताकद आजमावली आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी एका मोकळ्या मैदानात स्टन-ग्रेनेड आणि टियर स्मोकसह प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरे जाण्याचे ‘रिअल-टाइम’ ड्रिल (रंगीत तालीम) यशस्वीरीत्या पार पाडले. या वेळी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याकडून स्टॅन ग्रेनेड-४०, स्टॅन सेल-८८, टीअर्स स्मोक सेल नॉर्मल- १०, स्तिअर्स स्मोक ग्रेनेड-४३, स्पॅड ५० एम एल-१५, मल्टी बॅटन राउंड-५ या दारूगोळ्याचा वापर करून प्रात्यक्षिक घेण्यात आले.

पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सराव पार पडला. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्यासह सहा पोलिस अधिकारी, ३० अंमलदार आणि २० प्रशिक्षणार्थी पोलिस सहभागी झाले होते. संवेदनशील भागांत अनुचित प्रकार घडल्यास नेमकी काय रणनीती आखायची, याचे सखोल प्रशिक्षण या वेळी देण्यात आले. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ ‘११२’ या हेल्पलाइनवर संपर्क साधा, निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा.

आधुनिक शस्त्रास्त्रांचा सराव
दंगा काबू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांचा या वेळी प्रत्यक्ष वापर करून जवानांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रात्यक्षिकात दारूगोळ्याचा वापर करण्यात आला.
स्टन ग्रेनेड व सेल: आवाजाद्वारे जमावाला पांगवण्यासाठी.
टीअर स्मोक सेल (अश्रुधूर): जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी.
मल्टी बॅटन राउंड्स : आपत्कालीन परिस्थितीत संरक्षणासाठी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com