बळीराजाचे पशुधन संकटात

बळीराजाचे पशुधन संकटात

Published on

बळीराजाचे पशुधन संकटात
मोखाड्यात विचित्र आजाराची लागण, चार जनावरांचा मृत्यू
मोखाडा, ता. १३ (बातमीदार)ः सायदे ग्रामपंचायत हद्दीतील जोगलवाडी, शेळकेवाडी, राजेवाडी गावात जनावरांना संसर्गजन्य रोगाचे लागण झाल्याने एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधन संकटात आले आहे.
मोखाडा तालुक्यातील करोळ, पाचघर, किनिस्ते, आडोशी, पाथर्डी, सूर्यमाळ, गोमघर, सायदे गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याची माहिती आहे. जनावरांच्या फऱ्याला सूज, पोट फुगणे, गळा सुजणे, लघवी अटकने, ताप अशी लक्षणे आहेत. यामुळे सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित भेट देऊन गावातील जनावरांना लस देण्याचे काम सुरू केले आहे, तर गंभीर अवस्थेत असलेल्या एकूण तीन जनावरांवर उपचार चालू केले आहेत.
------------------------------------
शेतकरी हवालदिल
संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच आजाराची लागण होऊन २५ हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यांची नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
-------------------------------
जोगलवाडी गावात चार जनावरे दगावली आहेत. हा संसर्गजन्य रोग आहे की नाही हे निश्चित सांगू शकत नाही, परंतु याबाबत आम्ही त्वरित गावातील सर्व जनावरांना लसीकरण केले आहे.
- डॉ. राजेश हरापले, सहाय्यक पशुधन अधिकारी
---------------------------------
माझा नांगर हाकणाऱ्या जोडीपैकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. शेती करण्यासाठी बैल नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ येणार असून, मला शासनाने याबाबत मदत करावी.
- चंद्रकांत घाटाळ, शेतकरी, जोगलवाडी

Marathi News Esakal
www.esakal.com