गाव-पाड्यांवर संक्रांतीचा उत्साह
गाव-पाड्यांवर संक्रांतीचा उत्साह
स्थलांतरीत मजूर कुटुंबांसह पालघरमध्ये परतले
कासा, ता. १४ (बातमीदार)ः ग्रामीण भागातील आदिवासी, कातकरी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कामधंद्याच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात. मात्र, मकर संक्रांतीसाठी पुन्हा गावाकडे परतत असल्याने गाव-पाड्यांवर उत्साहाचे वातावरण आहे.
पावसाळ्यातील चार महिने गावात शेती, मजुरी, घरकाम करून कुटुंबाचा गाडा ओढल्यानंतर उर्वरित जवळपास आठ महिने ही कुटुंबे मुंबई, ठाणे, वसई-विरार, सुरत शहरात मजुरीसाठी जातात. चार दिवस हा सण कुटुंबासोबत, नातेवाइकांमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करून स्थलांतरित पुन्हा कामाच्या ठिकाणी परततात. सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाहेरगावी गेलेली कुटुंबे संक्रांतीसाठी परतल्याचे चित्र दिसून येत आहे. संक्रांतीच्या निमित्ताने गावाकडे येणाऱ्या स्थलांतरित कुटुंबांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाका परिसरात गजबज निर्माण झाली आहे, तर स्थानिक बाजारपेठा गर्दीने भरल्या आहेत.
--------------------------------
मजुरीसाठी शहरांकडे धाव
प्रशासनाने ग्रामीण भागातील आदिवासी व कातकरी नागरिकांचे स्थलांतर थांबावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे सुरू केली आहेत. मात्र, मिळणारी मजुरी कमी असून, वेळेवर मिळत नसल्याची तक्रार मजुरांकडून होत आहे. त्यामुळे वेळेवर मिळणारी मजुरीसाठी शहरांकडे वळतात.
-----------------------
रोजगारनिर्मिती गरजेची
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक संस्थांच्या मदतीने पालेभाज्यांची लागवड करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही मोठ्या प्रमाणावर मजूरवर्ग रोजगारासाठी शहरी भागात स्थलांतर करतात. त्यामुळे ग्रामीण भागात शाश्वत रोजगारनिर्मिती, वेळेवर मजुरी देणे, स्वयंरोजगाराला चालना देणे, जनजागृती वाढवण्याची नितांत गरज आहे.
---------------------------
संक्रांतीसाठी आम्ही चार दिवसांसाठी पुन्हा गावाकडे आलो आहोत. सण साजरा करून पुन्हा कामाच्या ठिकाणी निघणार आहोत. तिथे पाचशे ते आठशे रुपये मजुरी वेळेवर मिळते, म्हणून शहरात जाऊन काम करतो.
- राजाराम रावते, मजूर, चळणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

