नवीन स्मार्ट मीटरमुळे जामशेत परिसरातील शेतकरी, नागरिक अडचणीत
स्मार्ट मीटरच्या अवाजवी बिलांचा शेतकऱ्यांना फटका
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा
कासा, ता. १४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील जामशेत परिसरात महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे शेतकऱ्यांना अवाजवी आणि चुकीची वीजबिले येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) आमदार विनोद निकोले यांची भेट घेऊन व्यथा मांडली. याविरोधात आता १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे निकोले यांनी सांगितले.
महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी विनोद निकोले यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. स्मार्ट मीटरमुळे येत असलेल्या अवाजवी व चुकीच्या वीजबिलांबाबत महावितरण प्रशासनाकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. यावर १९ जानेवारी रोजी चारोटी ते पालघर असा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल. अवाजवी व चुकीची वीज बिले तात्काळ दुरुस्त करण्याची ठोस मागणी करण्यात येईल, असे आश्वासन आमदार विनोद निकोले यांनी शेतकऱ्यांना दिले.
या वेळी तालुका सचिव रडका कलांगडा, महाराष्ट्र राज्य किसान सभा कार्याध्यक्ष चंद्रकांत घोरखना यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरच्या नावाखाली शेतकऱ्यांवर लादण्यात येणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
१३० वरून थेट १४ हजार वीजबिल
महावितरणचे स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पहिल्या महिन्यात अवघे १३० रुपये इतके वीजबिल आले. मात्र, कोणताही अतिरिक्त वीजवापर नसतानाही दुसऱ्या महिन्यात थेट सहा हजार वीजबिल आले. त्यानंतर तिसऱ्या महिन्यात हेच बिल तब्बल १४ हजारांपर्यंत पोहोचल्याने शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत असून, आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

