केंद्रस्तरीय खरेदीमुळे ६० टक्क्यांहून अधिक औषधे रुग्णालयांमध्ये उपलब्ध

केंद्रस्तरीय खरेदीमुळे ६० टक्क्यांहून अधिक औषधे रुग्णालयांमध्ये उपलब्ध

Published on

औषध पुरवण्यात सुधारणा?
रेड सर्क्युलर पद्धतीचा पालिका रुग्णालयांना फायदा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पालिका रुग्णालयांमध्ये औषधांच्या तुटवड्याबाबत सातत्याने तक्रारी येत असतानाच, औषध खरेदीसाठी लागू करण्यात आलेल्या रेड सर्क्युलर (आर.सी.) पद्धतीमुळे पुरवठा प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. सध्या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांपैकी ६० टक्क्यांहून अधिक औषधे उपलब्ध झाली असून उर्वरित औषधांचा पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यापूर्वी औषध खरेदी आणि पुरवठ्यात अनेक अडथळे येत होते; मात्र गेल्या वर्षापासून प्रथमच अमलात आलेल्या आर.सी. पद्धतीमुळे ही प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि पारदर्शक झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पालिका रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन केंद्रीय खरेदी विभागामार्फत सर्व रुग्णालयांसाठी एकत्रित औषध खरेदी केली जाते; मात्र गेल्या एका वर्षापासून केईएमपासून इतर सर्वच रुग्णालयांमध्ये औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे; पण ही समस्या लवकर सुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रक्रियेत सर्व रुग्णालयांकडून औषधांची मागणी मागवून ती १२ वेगवेगळ्या शेड्युल्सनुसार वर्गीकृत केली जाते. त्यानुसार, टेंडर प्रक्रिया राबवून संबंधित कंपन्यांची निवड केली जाते. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट इंजेक्शनची एकत्रित मागणी एक लाख इतकी असल्यास, त्या निकषांनुसार कंपन्यांकडून टेंडर मागवले जाते. निवड झालेल्या कंपनीने ठरलेल्या कालावधीत औषधांचा पुरवठा करणे बंधनकारक असते; मात्र कंपनीने वेळेत औषध पुरवठा न केल्यास संबंधित रुग्णालयांना तातडीने थेट औषध खरेदी करण्याची मुभा दिली जाते.

आर.सी. पद्धतीमुळे औषधपुरवठा अधिक पारदर्शक आणि वेगवान झाला आहे. सध्या ६० टक्क्यांहून अधिक औषधे रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली असून उर्वरित औषधांचाही पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ही पद्धत रुग्णहिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे.
- डॉ. शैलेश मोहिते, संचालक, प्रमुख वैद्यकीय रुग्णालये

रेड सर्क्युलर पद्धत म्हणजे काय?

- रेड सर्क्युलर (आर.सी.) ही केंद्रस्तरीय औषध खरेदीची नवी पद्धत
- या पद्धतीने स्थानिक खरेदी किंवा स्वतंत्र टेंडरची गरज कमी होते
- नियुक्त अधिकाऱ्यामार्फत औषध ऑर्डर प्रक्रिया केली जाते
- आर.सी. मंजुरी नसलेल्या औषधांसाठी स्वतंत्र स्थानिक टेंडर
- कंपनी अपयशी ठरल्यास रुग्णालय थेट औषध खरेदी करते

फोटो - 791

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com