सायबर फसवणुकीपासून सावधान, पालघर पोलिसांचे आवाहन

सायबर फसवणुकीपासून सावधान, पालघर पोलिसांचे आवाहन

Published on

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

पालघर, ता. १५ (बातमीदार) : पालघर पोलिसांनी डिजिटल सुरक्षिततेसाठी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. सायबर सुरक्षा मोहिमेअंतर्गत जागरूकता अभियान राबवले जात आहे. नव्या वर्षात प्रवेश करताना केवळ जुन्या आठवणीच मागे सोडू नका, तर जुने आणि असुरक्षित पासवर्डही बदला, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पालघर पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना ‘ स्टे सायबर सेफ हॅशटॅग ’ वापरून सुरक्षित डिजिटल व्यवहारांचे महत्त्व पटवून दिले आहे. समाजमाध्यम वापरकर्ते सर्व ठिकाणी जवळपास एकच ई-मेल आणि एकच पासवर्ड वापरतात. याचा फायदा घेऊन नागरिकांची खासगी माहिती चोरीला जाऊ शकते. यातून सायबर गुन्हा घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पासवर्डमध्ये वारंवार बदल करावेत. सोप्या पासवर्डऐवजी अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हांचा समावेश करून सुरक्षित राहावे. समाजमाध्यम आपल्या खात्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘ टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ’ सुरू करावे, आपला पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. तसेच सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे पोलिस प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com