मुस्लिमबहुल भागात मतदानासाठी रांगा

मुस्लिमबहुल भागात मतदानासाठी रांगा

Published on

मुस्लिमबहुल भागात मतदानासाठी रांगा
मालाड, ता. १५ (बातमीदार) :
मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात मुस्लिम व उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. वॉर्ड क्रमांक ३३, ४८ व ४९ मध्ये दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास हळूहळू मतदानासाठी गर्दी वाढू लागली. तसेच वॉर्ड क्रमांक ३४ व ४६ मधील मराठीबहुल भागांतही मतदान उत्साहात सुरू होते. वॉर्ड क्रमांक ४६मध्ये मराठी मते एकवटलेली दिसून आली.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक ४७मध्ये अण्णामलाई प्रकरणामुळे तमिळ मतदार भावनिक झाल्याची चर्चा असून, त्याचा फायदा भाजपचे उमेदवार तेजिंदर सिंह तिवाना यांना होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वॉर्ड क्रमांक ३४ मधील टाऊनशिप शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३ वर मतदान तब्बल २० मिनिटे उशिरा सुरू झाले. मतदान यंत्र सुरू करताना अडचणी आल्यामुळेही विलंब झाला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर दाखल झाले होते. या काळात मतदारांची मोठी रांग लागली होती. माजी नगरसेविका व वॉर्ड क्रमांक ३३मधील काँग्रेसच्या उमेदवार कमरजहाँ सिद्दीकी यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही रांगेत उभे असल्याचे दिसून आले. याशिवाय अनेक मतदारांची नावे मतदार यादीत न सापडल्याने तसेच काहींचे मतदान केंद्र बदलल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पसरली होती. नजमुद्दीन इब्राहिम शेख या मतदाराचे नाव यादीत नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत आपण मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com