वाढत्या थंडीने दूध उत्पादकांना फटका

वाढत्या थंडीने दूध उत्पादकांना फटका

Published on

वाढत्या थंडीचा दूध उत्पादकांना फटका

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : गेल्या महिनाभरापासून जव्हार शहर तसेच ग्रामीण भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीचा फटका जनावरांच्या आरोग्यावर होत असून, त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होताना दिसून येत आहे.
मागील काही दिवसांपासून तापमान घटल्यामुळे अनेक पशुपालकांच्या जनावरांचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. थंडीमुळे जनावरे सुस्त होत असून चारा कमी खाणे, दूध उतरण्याची क्षमता घटणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. आधीच वाढलेला चाऱ्याचा खर्च आणि आता दूध उत्पादनात झालेली घट यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. जव्हार पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाने थंडीच्या काळात जनावरांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले असून, जनावरांना उबदार जागा, कोरडा चारा, स्वच्छ पाणी आणि आवश्यक असल्यास तत्काळ उपचार देण्याचा सल्ला दिला आहे.

चौकट
माझ्याकडे असलेल्या म्हशी अगोदर एका वेळेला साधारणपणे पाच लिटर दूध द्यायच्या. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केवळ तीन लिटरच दूध निघत आहे. अचानक झालेली ही घट दूध उत्पादनावर मोठा परिणाम करीत असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
- आकाश शिरसाट, पशुपालक
--------------
थंडीमुळे जनावरांना आजारपण जास्त जाणवत आहे. औषधोपचार आणि चाऱ्यावर मोठा खर्च होत आहे. आधीच दूध दर स्थिर आहेत. त्यात उत्पादन घटल्याने पशुपालन तोट्यात चालले आहे.

- दीपक काकरा, पशुपालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com