एकनाथ शिंदे याच्या गडाला हादरा

एकनाथ शिंदे याच्या गडाला हादरा

Published on

एकनाथ शिंदे याच्या गडाला हादरा
माजी महापौर वैती पराभूत; मशाल पेटली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक १३ मध्येच सत्ताधाऱ्यांना हादरा बसला आहे. या प्रभागात ठाकरेंची मशाल पेटली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शहाजी खुस्पे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे या प्रभागात ठाकरे गटाच्या शिलेदारांनी शिंदे गटाच्या वतनदारांना कडवी झुंज दिली आहे. अगदी थोडक्यात येथील शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
ज्ञानेश्वरनगर, रामचंद्रनगर, काजूवाडी, हाजुरीगाव परिसर असलेल्या प्रभगा क्रमांक १३ मधून शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती पॅनेल अ मधून, माजी नगरसेविका निर्मला कणसे पॅनेल ब, तर वर्षा शेलार पॅनेल क आणि अनिल भोर पॅनेल ड मधून मैदानात उतरले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या प्रभागातच ठाकरे गटाने आव्हान देण्यासाठी उभे केले होते. त्यात यश आले आहे. ठाकरेंचा पहिला उमेदवार या प्रभागातून विजयी झाला आहे. माजी महापौर अशोक वैती यांचा ६२४ मतांनी पराभव केला आहे.
पॅनल ड मधील शिंदे गटाचे अनील भोर यांना ११ हजार ७४९ मते मिळाली. तर ठाकरे गटाचे संजय दळवी यांना ११ हजार ५०३ मते मिळाली. अवघ्या २४६ मतांनी भोर यांना विजय गाठता आला आहे. प्रभाग क मध्येही शिंदेंच्या उमेदवारांना घाम फुटला होता. त्यामुळे या प्रभागातील तीन पॅनलवर शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला असला तरी माजी महापौरांचा पराभव जिव्हारी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com