बीपीएड सीईटीच्या प्रवेश नोंदणीला सुरुवात
बीपीएड सीईटीच्या
प्रवेश नोंदणीला सुरुवात
मुंबई, ता. १६ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड) या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. ही नोंदणी २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन होणार आहे. २०२५ च्या बीपीएड सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये ६५९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ४ एप्रिल रोजी होणार आहे, तर याची फिल्ड परीक्षा ५ ते ७ एप्रिलदरम्यान होणार आहे.
एमएचटी सीईटी पीसीएम व पीसीबी समूह, एमबीए/एमएमएस, एमसीए, तीन व पाचवर्षीय एलएलबी, बी. एड., एमएड, बीएड-एमएड ( तीनवर्षीय एकत्रित अभ्यासक्रम ), एम.पी.एड., एम. एचएमसीटी, बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम, एमबीए (इंटिग्रेटेड) व एमसीए (इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. राहिलेल्या बी. डिझाईन, एएसी (फाईन आर्ट्स), डीपीएन/पीएचएन (वैद्यकीय) व नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील. दरम्यान, बीपीएड या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेस २०२३-२४ मध्ये ९३९९, २०२४-२५ मध्ये ७३९९ व २०२५-२६ मध्ये ६५९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

