

वसई-विरारमध्ये पिवळे वादळ
नागरिकांचा जल्लोष; शिट्टीच्या आवाजाने परिसर दणाणला
प्रसाद जोशी, सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १६ ः वसई-विरार महापालिकेत एकहाती सत्ता काबीज करीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा गड राखला आहे. एकूण ७१ नगरसेवक निवडून आल्यामुळे नागरिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शिट्टीचा जोरदार आवाज करीत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणू सोडला.
वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवारी (ता. १६ ) मतमोजणी सुरू झाली. या वेळी पहिल्या फेरीत बहुजन विकास आघाडीने ११५ जागांवर आघाडी घेतली. पालिकेच्या परिसरात गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर भाजपनेदेखील खाते उघडले आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद निर्माण झाला. फेरी सुरू असताना कधी बविआ पुढे, कधी भाजप मागे त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक तर कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू होती. प्रभागांनुसार लागलेल्या निकालात आपल्या पक्षाचे पॅनेल निवडून आल्याची घोषणा होताच बहुजन विकास आघाडीचा विजय असो, हितेंद्र ठाकूर यांचा विजय असो, जय श्री राम, भाजपच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. झेंडे फडकविण्यात आले. कुठे पिवळा रंग तर कुठे गुलाल उधळला गेला.
-------------
मिठाई वाटत, भरवत हर्षोल्लास
प्रभागातील उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आणि ते मुख्यालयातून बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी गराडा घातला. विजेत्यांना उचलून घेतले. एकमेकांना मिठाई भरवली. या वेळी विजेत्यांच्या पत्नी, आई, बहीण, नातेवाईक, मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
------------
समाजमाध्यमांवर अभिनंदन वर्षाव
नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांवर समाजमाध्यमांतून शुभेच्छा, अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत हाेेता. प्रभागातील उमेदवार आपली कामे करणार, असा विश्वास या वेळी नागरिकांनी व्यक्त केला.
--------------
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरला. त्यामुळे आमचे पॅनेल निवडून आले. मतदारांचे मनापासून आभार. यापुढे विकासाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न असेल.
- सुनील आचोळकर, नवनिर्वाचित नगरसेवक, बविआ
------------
निवडणुकीत प्रचार करताना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या समस्या, नव्या योजना तसेच विकासाची कामे प्रभागात करण्यासाठी प्रयत्न करणार.
- कल्पेश मानकर, नवनिर्वाचित नगरसेवक, बविआ
-----------
पहिल्यांदा राजकारणात उतरले, मात्र मतदारांनी नव्या चेहऱ्याला पसंती दिली. पालिकेत निवडून आल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या हितासाठी काम करणार.
- निम्मी निपुण दोशी, नवनिर्वाचित नगरसेविका, भाजप
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.