शिवसेना भवनाची शान मनसेने राखली
शिवसेना भवनाची शान मनसेने राखली
दादर, मातोश्रीच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा दमदार विजय
रजनिकांत साळवी ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः मातोश्रीचा परिसर, दादरचे शिवसेना भवन व शिवाजी पार्क परिसर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या काही दशकांपासून अपवाद वगळता या ठिकाणी ठाकरेंचा शब्द अंतिम ठरला आहे. या वेळी शिंदेंच्या शिवसेनेने या ठिकाणी जोर लावला होता; मात्र या लढाईत ठाकरे बंधूंच्या सैनिकांनी हा किल्ला अबाधित राखला आहे.
प्रभाग क्रमांक ९३मध्ये मातोश्रीचा समावेश होतो. या प्रभागातून शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे यांनी १० हजारांहून अधिक मताने शिवसेनेच्या सुमीत वजाळे यांना पराभूत केले, तर शिवसेना भवनाचा अंतर्भाव असलेल्या वॉर्ड क्रमांक १९२मधून या वेळी राज ठाकरेंचे विश्वासू शिलेदार यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांना पराभूत केले. पाटणकर यांनी अखेरच्या क्षणी ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना भवनाच्या लागून असलेला प्रभाग क्रमांक १९१मध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे राहत असेलला शिवाजी पार्कचा परिसर येतो. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार माजी महापौर विशाखा राऊत यांनी शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया गुरव-सरवणकर यांना पराभूत केले आहे. विधानसभा निवडणुकीत या वॉर्डातून सदा सरवणकर ३००हून अधिक मतांनी पुढे होते. वरळी व दादर माहीम या भागात शिवसेना ठाकरेंच्या उमेदवारांना निवडून आणण्यात आमदार महेश सावंत यांनी मोठी भूमिका बजावली आहे.
...
प्रभाग-१९१
विजयी उमेदवार- विशाखा राऊत, (शिवसेना ठाकरे गट)- मते -१३,२१६
पराभूत- प्रिया गुरव (शिवसेना) - मते - १२,०३९
..
प्रभाग क्रमांक-१९२
विजयी उमेदवार - यशवंत किल्लेदार (मनसे)- मते - १४,२५३
पराभूत- प्रीती पाटणकर (शिवसेना) - मते - १२,८२२
..
प्रभाग क्रमांक -९३
विजयी उमेदवार- रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे गट)- मते - १०,२६८
पराभूत- सुमीत वजाळे (शिवसेना) मते - ६,०५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

