हितेंद्र ठाकूर राजकीय खेळी उत्तीर्ण

हितेंद्र ठाकूर राजकीय खेळी उत्तीर्ण

Published on

डावपेचात ‘बविआ’ सरस
वसई-विरार महापालिकेत भाजप चीतपट
प्रसाद जोशी ः सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीतील अपयशाने बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा ठाकूर यांचे अस्तित्व संपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. वसई-विरार महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार, असे वातावरण तयार झाले होते; मात्र बविआच्या कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार, निर्णायकक्षणी वरिष्ठ नेत्यांच्या निर्णायक डावपेचांमुळे भाजपला चीतपट केले आहे.
वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात वसई, नालासोपारा दोन तर बोईसर विधानसभेतील अर्ध्या भागाचा समावेश आहे. विधानसभेत नालासोपारा येथून भाजपचे नाईक, वसईतून स्नेहा दुबे पंडित यांनी विजयश्री खेचून आणली होती. बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभवामुळे ठाकूर यांच्या अस्तित्वाला धक्का लावल्याचे बोलले जात होते; परंतु नागरिकांच्या प्रश्नांवरून हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर पुन्हा मैदानात उतरल्याने नवा जोश संचारला. जनतेच्या समस्या सोडविताना बविआने महापालिका मुख्यालयाबाहेर केलेली आंदोलने निर्णायक ठरली. तर दुसरीकडे महापालिकेवर आमचाच झेंडा असा नारा देणाऱ्या महायुती निवडणुकीत गाफील राहिल्याने मतदारांनी बविआला पसंती दिली.
---------------------------
नागरी प्रश्नांसाठी आंदोलने
- विधानसभा, लोकसभेत बविआविरोधात निर्माण झालेले परिवर्तन कालांतराने बदलले. भाजपची सत्ता पालिकेवर येणार, अशी चर्चा रंगत असताना वसई-विरार शहरातील नागरी समस्येवरून केलेली आंदोलने निर्णायक ठरली.
- महावितरणला घेराव, विविध कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेतील पाठपुराव्यामुळे मतदारांमध्ये बविआबद्दल विश्वास वाढला होता. त्यामुळे पालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यावर खचून गेलेल्या कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळाली होती.
-------------------
कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा
वसई-विरार महापालिकेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ७१ जागांवर घवघवीत यश मिळाल्याने बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे एकीकडे राज्यामध्ये भाजपची लाट दिसून आली. मुंबईसह अनेक पालिकांमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व मिळवले; परंतु वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीच्या मनसुब्यांना धूळ चारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com