महिलांची मॅरेथॉन उत्साहात

महिलांची मॅरेथॉन उत्साहात

Published on

मिनी मॅरेथॉनला महिलांचा उत्तम प्रतिसाद
ग्रामीण महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

जव्हार, ता. १७ (बातमीदार) : मकर संक्रांतीचे औचित्य साधत, समग्र ग्राम विकास प्रकल्पांतर्गत व पॅनासॉनिक उपक्रमाच्या सहयोगाने बायफ संस्था, जव्हार यांच्या माध्यमातून न्याहाळे बुद्रुक येथे बुधवारी (ता. १४) १५०० मीटर महिला मिनी मॅरेथॉमनचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत परिसरातील ९२ ग्रामीण महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.
या मॅरेथॉनला जव्हारच्या पंचायत समितीच्या पर्यवेक्षिका जागृती किरकिरे, न्याहाळे बुद्रुकचे उपसरपंच नरेश पढेर, ग्रामपंचायत सदस्य गीता निलेश मोरघा व सुशिला विजय दुधेडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे आशा धर्मेंद्र कोरडा व सुनंदा चंदर कोरडा यांनी पटकावला, तर वांगणपाडा येथील सविता रामू भोरे या तृतीय क्रमांकावर आल्या. तथापि, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलाच खऱ्या अर्थाने विजेत्या ठरल्या, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. त्यांनी दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि सामूहिक एकता ही प्रेरणादायी असल्याचेही नमूद करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बायफ संस्था, जव्हारचे असोसिएट प्रोजेक्ट मॅनेजर राजेश कोतकर, प्रोजेक्ट ऑफिसर स्नेहल गायकवाड तसेच पॅनासॉनिक टीमचे आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

चौकट

अन् त्या माऊली अनवाणी धावल्या

ही मॅरेथॉन केवळ क्रीडा स्पर्धा न राहता ग्रामीण महिलांच्या दैनंदिन जीवनातील कष्ट, सहनशीलता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरली. शेतीकाम, डोक्यावरून ओझी वाहणे, अरुंद पायवाटांवरून चालणे आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांनी या स्पर्धेत आपली शारीरिक व मानसिक ताकद सिद्ध केली. दुपारच्या कडक उन्हात, रस्त्यावरील अडथळे ओलांडत, काही महिला चक्क अनवाणी धावल्या. त्यांच्या या जिद्दीचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com