- जिल्ह्यात रब्बी हंगामात २ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी !!!!
वाणगाव परिसरात हरभरा लागवडीला वेग
कृषी विभागाकडून बियाण्यांचे मोफत वाटप
वाणगाव, ता. १७ (बातमीदार) : भातपिकानंतर दुसरे पीक घेता यावे, या उद्देशाने उर्वरित ओलाव्यावर हरभरा पीक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी हरभरा बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाने जिल्ह्यातही वेग घेतला आहे. हरभरा पिकातून सुरुवातीला शेंडे खुडून कोवळी भाजी आणि नंतरच्या काळात घाटे भरून उत्पन्न अशा दुहेरी उत्पादनामुळे अनेक भागात रब्बीमध्ये हरभऱ्याची लागवड केली आहे. यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामात दोन हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.
भातपड क्षेत्रावर कडधान्य योजनांतर्गत जिल्ह्यात ५१९ हेक्टरवर हरभरा पिकांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत असून कृषी विभागाकडून जिल्ह्यात शेतकऱ्यांना २९३.४० क्विंटल इतके बियाणे मोफत वाटप करण्यात आले आहे. तर ४०.२ क्विंटल अनुदानित प्रमाणित बियाणे वितरण करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक किटमध्ये बियाणे, जिवाणू संघ व पीक संरक्षण निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
भात कापणीनंतर लगेच ओलितावर हरभरा बियाणे पेरल्यास कमी मशागत खर्चात चांगले उत्पादन व उत्पन्न काढता येवू शकते. यासाठी पिक पध्दतीत बदल करत हरभरा पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत बियाणे व निविष्ठा वाटप, शेती शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
- विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर
सध्या हरभऱ्याचे पीक घाटे भरण्याच्या अवस्थेत असून कोवळ्या भाजीपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. हरभरा फुलावर येण्याआधी दोन वेळा त्याची खुडणी केली, तर रोपाला अधिक पालवी येत. त्यामुळे झाडावरील प्रत्येक फांदीला जास्तीच्या घाट्या येतात. हरभऱ्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. हिवाळ्यामध्ये मिळणारी ही भाजी खाण्यासाठी खवय्ये वर्ग आतुरतेने वाट पाहत असतात.
- जयवंत पांडुरंग पाटील, हरभरा उत्पादक, वाढवण, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

