हरित उपक्रमांमुळे जेएनपीएत वायुगुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
जेएनपीएच्या पर्यावरणीय उपक्रमांमुळे वायुगुणवत्तेत सातत्यपूर्ण सुधारणा
हरित उपक्रम व सक्रिय निरीक्षणामुळे एक्यूआयमध्ये घट
उरण, ता.१७ (वार्ताहर) : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ठोस पावले उचलत जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) आपल्या कार्यक्षेत्रातील वायुगुणवत्ता सुधारण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. हरित उपक्रम, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि सततच्या निरीक्षणामुळे वायुगुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सातत्यपूर्ण सुधारणा होत असल्याचे अलीकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मागील वर्षाच्या तुलनेत पीएम १० कणांच्या पातळीत सातत्यपूर्ण सुधारणा नोंदविण्यात आली आहे. विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत अनुक्रमे सुमारे ३३ टक्के व २९ टक्के इतकी लक्षणीय घट झाली असून, हिवाळ्यात धूळजन्य प्रदूषण प्रभावीपणे नियंत्रणात आल्याचे यातून स्पष्ट होते. दरम्यान, पीएम २.५ कणांच्या पातळीत संमिश्र कल दिसून आला आहे. नोव्हेंबर महिन्यात पीएम २.५ मध्ये सुमारे २५ टक्के घट नोंदविण्यात आली असून, एकूण आकडेवारीनुसार हंगामादरम्यान मोठ्या आकाराच्या कणांमुळे होणारे प्रदूषण लक्षणीय प्रमाणात कमी झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
चौकट
जीवनमान उंचावण्यावरही भर
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचा भर केवळ बंदर संचालनापुरता मर्यादित नसून, परिसरातील जीवनमान उंचावण्यावरही आहे. बंदर परिसर व रस्त्यांवरील धूळ व उत्सर्जन नियंत्रणासाठी सातत्याने राबविण्यात आलेल्या प्रत्यक्ष उपाययोजनांमुळेच वायुगुणवत्तेत ही सुधारणा झाली असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी दिली आहे. तसेच आगामी काळात पाणी गुणवत्तेचे निरीक्षण, सुधारित कचरा व्यवस्थापन आणि अधिक स्वच्छ कार्यपद्धतींचा समावेश करून पर्यावरणीय उपक्रमांचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे बंदराचा विकास संतुलित, जबाबदार आणि शाश्वत पद्धतीने होत असून, बंदरातील कर्मचारीवर्गासह शेजारील समुदायांनाही त्याचा लाभ मिळेल.
विद्युत वाहनांचा वापर
जेएनपीएने आपल्या कार्यप्रणालीत विद्युत तसेच पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा समावेश केला आहे. सध्या बंदर परिसरात १० विद्युत कार व ५२ सीएनजी कार वापरात असून, कंटेनर यार्डमध्ये बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या माध्यमातून ५३ विद्युत ट्रक्स कार्यरत आहेत. पुढील टप्प्यात डिसेंबर २०२६ पर्यंत १५० हून अधिक विद्युत ट्रक्स तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले असून, अधिकृत कार व बसचेही विद्युत वाहनांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

