भिवंडीत नव्या चेहऱ्यांचा उदय

भिवंडीत नव्या चेहऱ्यांचा उदय

Published on

भिवंडीत नव्या चेहऱ्यांचा उदय
वज्रेश्वरी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीच्या निकालांनी प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे. परंपरागत राजकीय गणिते, पक्षांचे मोठे वलय आणि घराणेशाहीला नाकारत मतदारांनी स्थानिक प्रश्न आणि नव्या चेहऱ्यांवर विश्वास दर्शविला आहे. भाजप आमदारांच्या पुत्रापासून ते माजी उपमहापौरांच्या मुलांपर्यंत अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा कडू घास घ्यावा लागला आहे.

भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित महेश चौघुले यांचा प्रभाग १ (अ) मध्ये कोणार्क आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. मयूरेश पाटील यांनी १,६९७ मतांनी पराभव केला. समाजवादी पक्षाचे माजी उपमहापौर अहमद हुसेन सिद्दीकी यांची मुले अमिर आणि अविश सिद्दीकी यांना प्रभाग २ (अ) आणि ४ (अ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून पराभवाचा धक्का बसला. शिंदे शिवसेनेचे माजी आमदार रूपेश म्हात्रे यांचे बंधू संजय लक्ष्मण म्हात्रे यांना प्रभाग ९ (अ)मध्ये काँग्रेसचे तारिक मोमीन यांनी ९,०५४ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते श्याम अग्रवाल यांचा प्रभाग २२मध्ये अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर यांनी अवघ्या २१ मतांच्या निसटत्या फरकाने पराभव केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मुसंडी
प्रभाग ९ मध्ये काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, तर प्रभाग २ आणि ४ मध्ये राष्ट्रवादीने (शरद पवार गट) समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले.

आरपीआयला फटका
प्रभाग ३ मधील माजी नगरसेवक विकास निकम यांच्या संपूर्ण पॅनेलचा काँग्रेसने पराभव केला. मतदारांनी संपूर्ण पॅनेलच नाकारल्याने या भागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

अपक्षांची ताकद
या निवडणुकीत नितेश ऐनकर यांसारख्या अपक्ष उमेदवाराने मिळवलेला विजय आणि अ‍ॅड. मयूरेश पाटील यांनी प्रस्थापितांविरुद्ध दिलेली झुंज हे भिवंडीतील बदलत्या राजकीय मानसिकतेचे दर्शन घडवते. केवळ नावावर किंवा पक्षाच्या चिन्हावर अवलंबून न राहता जनतेशी संपर्क असलेल्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com