आमदार रईस शेख यांची भूमिका ठरणार निर्णायक

आमदार रईस शेख यांची भूमिका ठरणार निर्णायक

Published on

भिवंडी महापालिकेत पुन्हा त्रिशंकू अवस्था
सत्तास्थापनेसाठी आमदार रईस शेख यांची भूमिका निर्णायक
भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहरात पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेची चावी आता आमदार रईस शेख यांच्या हाती असल्याचे मानले जात आहे. २०१७मध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकूनही ‘कोणार्क आघाडी’ने बाजी मारली होती. तोच इतिहास पुन्हा घडणार की काँग्रेस-राष्ट्रवादीची युती सत्तेवर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षातील अंतर्गत वादामुळे आमदार रईस शेख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वरिष्ठ नेतृत्वाशी जवळीक साधली होती. भिवंडी पूर्वमधील काँग्रेसच्या २४ आणि राष्ट्रवादीच्या १२ जागांवर (एकूण ३६ जागा) रईस शेख यांचा थेट प्रभाव आहे. ३६ नगरसेवकांची ही मजबूत फळी रईस शेख यांच्या इशाऱ्यावर काम करणार असल्याने काँग्रेसला सत्ता स्थापन करायची असल्यास रईस शेख यांची भूमिका निर्णायक ठरेल.

तीन महत्त्वाची समीकरणे
१. महाविकास आघाडी प्रयोग : काँग्रेस (३०) + राष्ट्रवादी (१२) = ४२. बहुमतासाठी त्यांना अजूनही काही नगरसेवकांची किंवा समाजवादी पक्षाची साथ घ्यावी लागेल.
२. कोणार्क फॉर्म्युला : विलास पाटील यांची ‘कोणार्क विकास आघाडी’ पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत येऊन सर्वसमावेशक आघाडी करण्याचा प्रयत्न करू शकते.
३. भाजपचा अंबरनाथ पॅटर्न : २२ जागा जिंकलेली भाजप अंबरनाथप्रमाणे अनपेक्षित युती करून किंवा शिंदे शिवसेना आणि इतर गटांना सोबत घेऊन सत्तास्थापनेचा प्रयत्न करू शकते. मात्र मागील वेळी बंडखोर नगरसेवक अपात्र ठरल्याने यंदा बंडखोरी होण्याची शक्यता कमी आहे.

भाजपच्या हालचालींकडे लक्ष
भाजप सध्या सत्तास्थापनेसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीत आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेस सदस्यांना सोबत घेण्याचा प्रयोग येथेही राबवला जाऊ शकतो. विशेषतः शिंदे गटातील काही नगरसेवक आणि मागील वेळी अपात्र ठरलेल्या नगरसेवकांचे नातेवाईक भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पक्षांची सद्य:स्थिती आणि संख्याबळ :

काँग्रेस : ३० जागा (सर्वात मोठा पक्ष)
भाजप : २२ जागा
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : १२ जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com