राजकीय मैदानात ‘बॅट’ने फटका

राजकीय मैदानात ‘बॅट’ने फटका

Published on

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते १४ गावांतील प्रभाग क्रमांक १४ ‘ड’मधील अपक्ष उमेदवार भरत कृष्णा भोईर यांनी. भाजप व शिवसेना या बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांमध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भरत भोईर यांनी ६,८०८ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. विशेष म्हणजे, त्यांच्या विजयामुळे ते संपूर्ण नवी मुंबईतील एकमेव अपक्ष नगरसेवक ठरले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘बॅट’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या भरत भोईर यांनी भाजपचे उमेदवार महेश कुलकर्णी यांचा पराभव करत प्रभाग १४ ‘ड’ मध्ये धक्कादायक निकाल नोंदवला. मोठ्या पक्षांच्या संघटनात्मक ताकदीसमोरही स्थानिक प्रश्न, थेट जनसंपर्क आणि आक्रमक प्रचाराच्या जोरावर त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. या निकालामुळे नवी मुंबईच्या राजकारणात अपक्ष ताकदीचे महत्त्व अधोरेखित झाले असून, येणाऱ्या काळात महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये भरत भोईर यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com