अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची माहिती

अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची माहिती

Published on

अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची माहिती
मुलुंड, ता. १७ (बातमीदार) ः पश्चिमेतील एम. जी. रोड ते एस. एल. रोडकडे बेस्ट बस ज्या कोपऱ्यावर वळतात तो कोपरा अत्यंत धोकादायक आहे. बसना तीव्र वळण घ्यावे लागत असल्याने, हे ठिकाण पादचाऱ्यांसाठी विशेषतः धोकादायक ठरू शकते. विशेष म्हणजे, या ठिकाणी अनेक कोचिंग क्लासेस आणि फूड स्टॉल असल्याने येथे खूप गर्दी असते. येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्‍याने अपघातांचा धोका जास्त वाढतो. भांडुप बस अपघाताची पुनरावृत्ती मुलुंडमध्ये येथे होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवासी ओमकार जाधव यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com