मुंबई
घाटकोपर पश्चिममध्ये दुकानाला आग
घाटकोपर पश्चिममध्ये दुकानाला आग
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेतील खोत गल्ली परिसरात असलेल्या राजगुरू अपार्टमेंटमधील ‘अक्सा’ नावाच्या दुकानाला दुसऱ्या मजल्यावर शनिवारी (ता. १७) दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार ही आग एअर कंडिशनरमुळे लागल्याचे समोर आले आहे. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. विक्रोळी अग्निशमन केंद्राचे अधिकारी आव्हाड आणि त्यांचा कर्मचारीवर्ग यांनी तत्परतेने कारवाई करीत आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत माहिती देताना घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश जाधव यांनी सांगितले, की परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे.

