शिंदे सेने''च्या तरुण उमेदवारांना पसंती
शिंदे सेने''च्या तरुण उमेदवारांना पसंती
मंदार केणी, विक्रांत तांडेल यांचा विक्रमी विजय
ठाणे, ता. १८ : ठाणे महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब अजमावणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेच्या दोन तरुण शिलेदारांनी राजकारणातील प्रस्थापितांना धक्का देत घवघवीत यश संपादन केले आहे. मंदार केणी आणि विक्रांत तांडेल या दोन तरुण उमेदवारांनी २० हजारांहून अधिक मते मिळवत ‘सर्वाधिक मते’ घेण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे, मंदार केणी यांनी १५ हजारांहून अधिक मताधिक्य घेत या निवडणुकीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
घोडबंदर येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विक्रांत तांडेल यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी एकूण २०,४०० मते मिळवत या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमिला गावित यांचा पराभव केला. गावित यांना ९,२९८ मते मिळाली, तर तांडेल यांनी ११,१०२ मतांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला.
कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत मंदार केणी यांनी पहिल्याच प्रयत्नात इतिहास घडवला. त्यांनी २०,३९९ मते मिळवत प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) गटाचे विलास गायकर यांचा धुव्वा उडवला. गायकर यांना अवघी ५,२४३ मते मिळाली. मंदार केणी यांनी तब्बल १५,१५६ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवले असून, ते यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे नगरसेवक ठरले आहेत.
निवडणुकीची सांख्यिकी आकडेवारी
ठाणे महानगरपालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली.
एकूण मतदार : १६,४९,८६९
झालेले मतदान : ९,१७,१२३ (५५.५९%)
रिंगणातील उमेदवार : १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार (७ उमेदवार बिनविरोध).
मतदान घट : मागील वेळच्या ५८.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा मतदानात ३.२१% घट झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

