शिक्षक-पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ मार्गदर्शन
टोकावडे, ता. १७ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक; तसेच नैतिक विकासासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका अधिक सक्षम व सकारात्मक व्हावी, या उद्देशाने ‘पालक व सर्व शिक्षकांसाठी सुजाण पालकत्व’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा आणि जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा शनिवारी (ता. १७) शिवळे विद्यामंदिर हायस्कूल येथील सभागृहात पार पडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा शिक्षण मंडळाचे सहसचिव भास्कर हरड यांनी केले. शिक्षक अध्यापन करतो, विद्यार्थी अध्ययन करतो आणि या दोघांवरही दररोज मानसिक ताण येत असतो. हा ताण कमी करून शिक्षक व विद्यार्थ्यांना मानसिक समाधान मिळावे, यासाठीच अशा संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अजित फापाळे यांनी बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका, पालकांची जबाबदारी आणि सुजाण पालकत्वाचे महत्त्व यावर सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांचा मानसिक समतोल, भावनिक स्थैर्य आणि नैतिक मूल्यांची जपणूकही तितकीच महत्त्वाची आहे. पालक व शिक्षकांनी परस्पर समन्वय राखून काम केल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. मंडळाचे सहसचिव भास्कर हरड, संचालक बी. एम. पवार, प्राचार्य मनोहर इसामे, प्राचार्य डॉ. बडगुजर, उपप्राचार्य गीता विशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

