१९ वर्षांनंतर मनसेचे उघडले खाते

१९ वर्षांनंतर मनसेचे उघडले खाते

Published on

बेलापूर, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता. १६) हाती आला. केवळ भाजप आणि शिवसेनेत लढत होणार, हे जगजाहीर असताना जनतेने न भूतो न भविष्यती असे निकालदेखील काही प्रभागांत दिले. यामध्ये तब्बल १९ वर्षांनंतर नवी मुंबईत मनसेने आपले खाते उघडले असून, यामध्ये प्रभाग क्रमांक २२ मधून पक्षाचे अभिजित देसाई यांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक २२ मधून शिवसनेचे रंगनाथ औटी, भाजपचे काशीनाथ पाटील असे अनुभवी, मातब्बर प्रतिस्पर्धी उमेदवार असताना मनसेचे इंजिन या स्पर्धेत अव्वल ठरले. चुरशीच्या स्पर्धेत मनसेच्या अभिजित देसाई यांनी ८७ मतांनी विजय मिळवत मनसेचे खाते उघडले. दरम्यान, या विजयामुळे प्रभागात एक नवीन चेहरा नागरिकांच्या सेवेत आल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
----
विजयी उमेदवारांसाठी हँडबोर्डचे डायलॉग
बेलापूर, ता. १७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आला आणि सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामध्ये विजय मिळवलेल्या उमेदवारांच्या विजयी मिरवणुकांत यंदा विशेष लक्षवेधी ठरले ते कार्यकर्त्यांच्या हातातील हँडबोर्ड. ‘किंगमेकर’, ‘मोठमोठे गार केले गंमत मधी’, ‘यंदा नाही कायमच जोरात, रोक सको तो रोक लो’ अशा आशयाच्या हँडबोर्डने विजयी मिरवणुका लक्षवेधी ठरल्या.

१६ जानेवारीला पार पडलेल्या निवडणूक निकालात शुक्रवारी (ता. १६) विजयी उमेदवार गुलाल, भंडाऱ्यात न्हाऊन निघाले. जागोजागी आनंदाचे वातावरण दिसून आले. यामध्ये यंदा वेगवेगळ्या आशयाच्या हँडबोर्ड संकल्पना कार्यकर्त्यांनी समोर आणत आपल्या विजयी उमेदवारांसाठी जल्लोष केला. या आगळ्यावेगळ्या हँडबोर्ड मेसेजच्या मिरवणुकांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, पहिल्यांदाच अशा प्रकारचे हँडबोर्ड दिसून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com