कल्याण डोंबिवलीत मोठ्या मताधिकक्याने विजय तर काहींचा अल्पशा मताने झाला पराभव
कल्याण डोंबिवलीत मोठ्या मताधिकक्याने विजय तर काहींचा अल्पशा मताने झाला पराभव
कल्याण, ता. १७ (बातमीदार) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका रणधुमाळीत आता १२२ नगरसेवक अखेर नागरिकांना मिळाले आहेत. काही प्रभागांत सोपा विजय पाहायला मिळाला. तर, काही उमेदवार भरघोस मताधिक्याने एकतर्फी निवडून आले आहेत. तर काही ठिकाणी कांटे की टक्कर झाली असून काहीना अल्पशा मताने पराभव पत्करावा लागला आहे.
पॅनल क्रमांक १ ड मधून शिंदे गटाचे जयवंत भोईर यांनी सर्वाधिक १४,१०७ मतांनी विजय मिळवलेले नगरसेवक ठरले असून त्यांनी ठाकरे गटाच्या निलेश भोर यांचा पराभव केला आहे. पॅनल २० क मध्ये भाजपच्या खुशबू चौधरी यांनीही १०,०२८ मतांच्या फरकाने वंचित बहुजन आघाडीच्या अस्मिता सरवदे यांचा पराभव केला आहे. तर पॅनल ३१ ड मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या गजानन पाटील यांनीही १२,७१८ मतांनी मनसेच्या निवृत्ती पाटलांना पराभूत केले.
तर, दुसरीकडे निवडणुकीत शिंदे गटाच्या श्वेता जाधव या अल्पशा मतांनी पराभूत झालेल्या उमेदवार ठरल्या असून त्यांना ठाकरे गटाच्या निलेश खांबायात यांनी अवघ्या सहा मतांनी पराभूत केले. यानंतर जाधव यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, पुन्हा झालेल्या मोजणीनंतरही निकालात कोणताही फरक पडला नाही. पॅनल चार क मध्ये ठाकरे गटाच्या रूपा शेट्टी यांनाही शिंदे गटाच्या नमिता पाटील यांच्याकडून मात्र आठ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर पॅनल ८ ब मध्येही अपक्ष उमेदवार अजिजा खोत यांचा काँग्रेस उमेदवार समिना शेख यांनी ३८ मतांनी पराभव केला.
मोठ्या मताधिकक्याने निवडून आलेले टॉप ५ नगरसेवक :
१) पॅनल १ ड, जयवंत भोईर (शिवसेना शिंदे) - एकूण मते १९२१५ - एकूण फरक १४,१०७
२) पॅनल २० क, खुशबू चौधरी (भाजप) - एकूण मते १५,४६० - एकूण फरक १३,०२८
३) पॅनल ३१ ड, गजानन पाटील (शिंदे गट) - एकूण मते २३,७८७ - एकूण फरक १२,७१८
४) पॅनल १८ क, नवीन गवळी (शिंदे गट) - एकूण मते १५,७३७ - एकूण फरक १२,०५५
५) पॅनल २६ ड, मंदार हळबे (भाजप) - एकूण मते १५,३६३ - एकूण फरक ११,९४८
अल्पशा मतांनी पराभूत झालेले टॉप ५ नगरसेवक :
१) पॅनल १६ अ, श्वेता जाधव (शिंदे गट) - एकूण मते ११,७९१ - कमी पडलेली मते ६
२) पॅनल ४ क, रूपा शेट्टी (ठाकरे गट) - एकूण मते १०,५६० - कमी पडलेली मते ८
३) पॅनल ८ ब, अजिजा खोत (अपक्ष) - एकूण मते ४६२७ - कमी पडलेली मते ३८
४) पॅनल १० ब, विद्याधर भोईर (शिंदे गट) - एकूण मते ८७९७ - कमी पडलेली मते १७२
५) पॅनल १५ क, प्रभाकर गायकवाड (मनसे) - एकूण मते ९१९९ - कमी पडलेली मते २९३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

