निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी तोडफोड
भिवंडीत निवडणूक निकालानंतर रणकंदन!
अनेक ठिकाणी दगडफेक, तोडफोडीच्या घटना; २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल
भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : भिवंडी महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहरात ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. विविध प्रभागांत झालेल्या दगडफेक, मारहाण आणि तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी चार वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारे दोन डझनहून अधिक नामनिर्देशित व्यक्तींसह २०० हून अधिक अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
कल्याण रोडवरील लकडा मार्केट परिसरात घडली. ताहा असमोहम्मद खान (२५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास संशयितांच्या एका टोळक्याने काठ्या आणि शस्त्रांसह ‘एस. एस. के. फॅब्रिकेशन’ दुकानावर हल्ला केला. या वेळी प्रचंड दगडफेक करण्यात आली असून, दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी निहाल खान, इम्रान खान, एहसान खान यांच्यासह १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याच परिसरात दुसरी घटना निवडणूक चर्चेवरून घडली. इम्रान अब्दुल रहमान खान (४०) यांच्या तक्रारीनुसार, काही लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी शिवीगाळ करत कार्यालयात घुसून खुर्च्यांची तोडफोड केली. या हल्ल्यात काही कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
महिला उमेदवाराला मारहाण
दुसरीकडे, न्यू कणेरी येथील मार्कंडेय नगरमध्ये संतापजनक घटना घडली. श्रीनिवास नरसिंह वैंगल यांनी तक्रार दिली आहे की, १५ जानेवारी रोजी मतदान संपल्यानंतर, त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवल्याच्या रागातून काही जणांनी त्यांना वॉर्ड क्रमांक ३ च्या गेटसमोर अडवले. या वेळी दोन पुरुषांनी त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि मनोज ठाकूर व रतन सिंग यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, श्रीरंग नगरमध्ये राजेश चेरियाल यांना केवळ एका उमेदवाराला समर्थन दिल्यामुळे मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मनोज ठाकूर, श्रीकांत दासी, राजेश शेट्टी व इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सीसीटीव्ही तपास
हिंसाचार झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून त्याद्वारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. शहरात पुन्हा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसली तरी पोलिसांची पथके संशयितांच्या शोधात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

