एसआयएलसी
विद्यार्थ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण
शहरातील गरजू व बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ‘एसआयआयएलसी’तर्फे सवलतीत दोन महिन्यांचा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासोबत प्रमाणपत्र आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून, युवक-युवतींना करिअरची दिशा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत ‘सप्लाय चेन व लॉजिस्टिक्स व्यवस्थापन’ तसेच ‘प्रोफेशनल बॅक ऑफिस व कार्यालयीन प्रशासन’ हे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्याच्या उद्योगविश्वात या दोन्ही क्षेत्रांना मोठी मागणी असून प्रशिक्षित मनुष्यबळासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. तांत्रिक प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. यामध्ये इंग्रजी संभाषण कौशल्य, एमएस ऑफिस, अॅडव्हान्स एक्सेल, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत प्रशिक्षण तसेच नोकरी मार्गदर्शन यांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थी केवळ नोकरीसाठी पात्र ठरणार नाहीत, तर आत्मविश्वासाने मुलाखतींना सामोरे जाण्यास सक्षम होतील. या प्रशिक्षणासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असून वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे आहे. मर्यादित शुल्कात उपलब्ध असलेला हा कार्यक्रम बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे.
संपर्क : ७७५८९२४२७७, ९०२८९५४४२९
आयुर्वेदिक अभ्यंग मसाज कार्यशाळा
मसाज अथवा आयुर्वेदिक अभ्यंग केल्याने आरोग्यासंबंधी तक्रारी दूर होतात व वात-पित्त-कफाचे संतुलन राखले जाते. आरोग्याच्या जागृतीमुळे गेल्या काही वर्षांत सतत वाढत असणाऱ्या या क्षेत्रात तज्ज्ञ व्यावसायिकांना मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी तीनदिवसीय कार्यशाळा २३, २४ व २५ जानेवारी रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत अभ्यंग मर्दन संकल्पना, मसाजचे तंत्र, मंत्र व शास्त्र, मसाजचे फायदे, वात-पित्त-कफ प्रवृतीनुसार मसाज, उपयुक्त औषधी तेल, शिरोभ्यंग, पादाभ्यंग, विविध स्ट्रोक्स, स्नेहन, स्वेदन, पावडर मसाज, उदवर्तन, मसाज केव्हा, कधी किती वेळ करावा, कधी करू नये याबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२
शासकीय निविदा प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
महानिविदा संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध/फ्लॅश करणे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे खास अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण २५ जानेवारीला आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध संकेतस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. शासकीय निविदा प्रक्रियेत सहभागी असणारे अधिकारी, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर, सरकारी कंत्राटदार, स्थापत्य अभियंते व इतर संबंधित अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे. प्रशिक्षणात निविदा नोटीसची तयारी, निविदा प्रकाशित करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, संगणक सेटिंग, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन, प्री बीड मीटिंग, निविदा उघडण्याची प्रक्रिया, वर्क ऑर्डर इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

