पडघ्यात मुलींची संख्या लक्षणीय

पडघ्यात मुलींची संख्या लक्षणीय

Published on

पडघा, ता. १८ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे ‘सकाळ’ आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आर. के. पालवी विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात रविवारी पार पडलेल्या या स्पर्धेत मुले थंडीच्या कडाक्याच्या सकाळीही वेळेपूर्वी हजर होती. पालकांनीही मुलांना वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते, ज्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या गणवेशात येऊन चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य जसे पेन्सील, खोडरबर, वॉटर कलर, रंगीत खडू, स्केचपेन आणि विविध ब्रश घेऊन आले होते. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत चित्र रेखाटून रंगवण्यामध्ये आपली कौशल्ये दाखवली. स्पर्धा वयोगटानुसार चार गटांत घेतली गेली. पहिली-दुसरी (अ गट) आणि तिसरी-चौथी (ब गट)साठी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत, तर पाचवी ते सातवी (क गट) आणि आठवी ते दहावी (ड गट) वर्गासाठी सकाळी ९ ते १० या वेळेत स्पर्धा झाली. सर्व गटांमध्ये एकूण २७१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात मुलींची संख्या विशेष लक्षणीय होती. ज्यामुळे चित्रकलेच्या क्षेत्रात मुलींचा उत्साह दिसून आला.
स्पर्धेसाठी आर. के. पालवी विद्यामंदिरचे सुपरवायझर शिक्षक श्वेता आहीरे, नम्रता शेलार, नम्रता शिरसाठ, चंचल डोहाळे, स्वप्नाली तेलवणे, शमीका तांबोळी, वृषाली तेलवणे, माधुरी बोरसे, प्रतीक्षा जाधव, नीलेश जाधव, मयूर साबळे, आकांक्षा जाधव, सलोनी जाधव, पूजा पांडव आणि चालक महेश पवार यांनी मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या चित्रांमुळे शाळा परिसर रंगीबेरंगी झाला आणि उपस्थित शिक्षक, पालक व सहकारी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कौतुक व्यक्त केले. आयोजकांनी सांगितले, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला चालना मिळते; तसेच आत्मविश्वास आणि कलागुणांचा विकास होतो.

पडघा : येथील विद्यार्थ्यांनी चित्रकलेत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com