सिडकोच्या धोरणातून नवी मुंबईत पहिले ‘अर्बन अ‍ॅग्रीकल्चर सेंटर’ साकार

सिडकोच्या धोरणातून नवी मुंबईत पहिले ‘अर्बन अ‍ॅग्रीकल्चर सेंटर’ साकार
Published on

‘अर्बन अ‍ॅग्रीकल्चर सेंटर’ साकार
सिडकोच्या धोरणातून नवी मुंबईत पहिला उपक्रम

नवी मुंबई, ता. १८ : उच्चदाब वीज वाहिन्यांच्या खालील जमिनींचा हरित क्षेत्रासाठी उपयोग करण्याचे सिडकोने स्वीकारलेले धोरण आता फलदायी ठरत आहे. त्यातून नवी मुंबईतील पहिले अर्बन अ‍ॅग्रीकल्चर सेंटर उभे राहिले आहे. २००८ मध्ये सिडकोने कोकण कृषी विकास प्रतिष्ठानला खारघर सेक्टर पाच येथील उत्सव चौकाजवळ नर्सरी व अ‍ॅग्रो माहिती केंद्रासाठी दिलेल्या भूखंडावर हा उपक्रम आकाराला आला आहे.
गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या देशी तसेच इतर जातींच्या रोपांची लागवड, संवर्धन आणि प्रसारामुळे या नर्सरीला व्यापक ओळख मिळाली आहे. स्थानिक नागरिकांसह अनेक शेतकरी, बागकामप्रेमी आणि कृषी उद्योजक येथे नियमित भेट देत आहेत. या यशस्वी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर कोकण कृषी विकास प्रतिष्ठान आणि रत्नागिरी येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

कौशल्य विकासाला चालना
या कराराअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशात अर्बन अ‍ॅग्रीकल्चर, नैसर्गिक शेती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रात्यक्षिके, जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, क्षमतावृद्धी, तसेच अभ्यास दौऱ्यांसारख्या विस्तार उपक्रमांद्वारे शहरी शेती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या केंद्राचा लाभ नवी मुंबईसह इतर शहरी व निमशहरी भागातील शेतकरी, शहरी उत्पादक आणि कृषी उद्योजकांना होणार आहे.

या कार्यक्रम समन्वयक डॉ. मंदार गीते यांनी शहरी भागातील अन्नसुरक्षा, हरित आवरण वाढ, हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता आणि जैवविविधता संवर्धनात अर्बन अ‍ॅग्रीकल्चरचे महत्त्व अधोरेखित केले. हा सामंजस्य करार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नर्खेडे, कोकण कृषी विकास प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शेखर सावंत, कार्यक्रम समन्वयक डॉ. मंदार गीते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. संतोष वरवडेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सिडकोच्या या उपक्रमाला काही स्तरांतून विरोधही होत असून, त्यावरून चर्चा सुरू आहे; मात्र हरित विकास आणि शहरी शेतीच्या दृष्टीने हा उपक्रम नवी मुंबईसाठी मैलाचा दगड ठरत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com