जागतिक आर्थिक सहकार्य
मुंबईत पहिली ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशनची शिखर परिषद
परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन कौन्सिलकडून आयोजन
मुंबई, ता. १८ : भारत आणि परदेशातील वरिष्ठ धोरणकर्ते, जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि बहुपक्षीय संस्थांचे प्रतिनिधी १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ यादरम्यान मुंबईत होणाऱ्या पहिल्या ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन २०२६ (जीईसी)साठी एकाच व्यासपीठावर येत आहेत. ही शिखर परिषद फ्युचर इकॉनॉमिक कोऑपरेशन कौन्सिल (एफईसीसी) कडून आयोजित केली जाते. ही एक ना-नफा संस्था असून, परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहकार्याने तिची स्थापना करण्यात आली आहे.
पहिल्या ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन २०२६ परिषदेला मुख्यमंत्री आणि या परिषदेचे मुख्य प्रवर्तक देवेंद्र फडणवीस, भाजपचे परराष्ट्र कामकाज प्रभारी विजय चौथाईवाले संचालक आणि विश्वामित्र रिसर्च फाउंडेशनच्या संस्थापक प्रियम गांधी-मोदी संचालक आणि क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत. जागतिक आर्थिक संक्रमण होत असताना जीईसी २०२६ची रचना जागतिक व्यापार, गुंतवणूक प्रवाह आणि आर्थिक प्रशासनाचे आकार बदलणाऱ्या सखोल संरचनात्मक बदलांना तोंड देण्यासाठी करण्यात आली आहे. ही परिषद पायाभूत सुविधा, वित्तपुरवठा, प्रगत उत्पादन, तंत्रज्ञान प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि लवचिक पुरवठा साखळी यामधील विचारासह हा उपक्रम व्यापारापलीकडे सहकार्य अधोरेखित करेल. उच्चस्तरीय चर्चा आणि विचारांद्वारे आर्थिक कॉरिडॉर, गुंतवणूक भागीदारी, डिजिटल कनेक्टिव्हिटी, ईएसजी आराखडा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापरावर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.
जीईसी २०२६च्या दृष्टिकोनावर बोलताना प्रियम गांधी-मोदी म्हणाले, ‘जागतिक अर्थव्यवस्था एका निर्णायक दशकात प्रवेश करत आहे; जिथे अर्थव्यवस्थांचे रक्षण विभाजन, संरक्षणवाद आणि अनिश्चिततेच्या धोक्यांपासून करण्याची आवश्यकता आहे. जागतिक आर्थिक सहकार्य २०२६च्या माध्यमातून भारतातील सरकारे, गुंतवणूकदार आणि आघाडीच्या उद्योगांना एकत्र आणून भांडवल, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रातील सहकार्यासाठी व्यावहारिक मार्ग तयार करून पुढे जात आहे. त्यातून बहुध्रुवीय जगाचे सत्य आणि जागतिक समृद्धीसाठी आपली सामायिक जबाबदारी स्पष्ट होते.’ तर विजय चौथाईवाले यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, भारताने जागतिक नेत्यांसोबत दीर्घकालीन भागीदारी निर्माण केली आहे. ती वाढत्या बहुध्रुवीय जगात काळाच्या कसोटीवर उतरली आहे. आज आर्थिक सहभाग भौगोलिक राजकारणापासून अविभाज्य आहे. अशा वेळी, आम्ही जीईसी २०२६चे आयोजन करत आहोत.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

